Hingoli Water Shortage
Hingoli Water ShortageSaam tv

Hingoli Water Shortage : हिंगोलीत ऐन पावसाळ्यात पाणी बाणी; आठ दिवसांपासून जलवाहिनी बंद, सामाजिक कार्यकर्त्याने केला टँकरने पाणीपुरवठा

HIngoli News : हिंगोली शहर व परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. हिंगोली शहरात देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. साधारण दोन तीन दिवस पूर होता.
Published on

हिंगोली : हिंगोली शहरात ऐन पावसाळ्यात पाणी बाणी निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे हि परिस्थिती ओढवली असून मागील आठ दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेत टँकरने पाणी पुरवठा केला आहे.  

हिंगोली (Hingoli) शहर व परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. हिंगोली शहरात देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. साधारण दोन तीन दिवस पूर होता. यामुळे प्रचंड नुकसान झाले असून या पुराच्या पाण्यात हिंगोली शहरात पाणी पुरवठा करणारी पालिकेची मुख्य जलवाहिनी वाहून गेल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मागील आठ दिवसांपासून शहरातील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई (Water Shortage) निर्माण झाली आहे. 

Hingoli Water Shortage
Nalasopara Crime: धक्कादायक.. नालासोपाऱ्यात ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

दहा टँकर पुरविले 

दरम्यान मागील आठ दिवसांपासून नागिरकांना पाणी मिळत नसल्याने हिंगोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते जुबेर मामू यांनी दहापेक्षा जास्त टँकरद्वारे शहरातील सिद्धार्थ नगर भागात पाण्याचा पुरवठा केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com