Nalasopara Crime
Nalasopara CrimeSaam tv

Nalasopara Crime: धक्कादायक.. नालासोपाऱ्यात ३० वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Woman gang-raped in Nalasopara Crime Updates: पीडित महिला हि उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी असून तिच्या पतीसोबत वाद झाल्याने ती पुण्याला नोकरीच्या शोधात जात होती.
Published on

महेंद्र वानखेडे

Nalasopara Sexual Abuse Crime Updates : नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत तीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर आचोळे पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. 

वसई- विरार (Vasai Virar) परिसरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. दरम्यान ८ सप्टेंबरला नालासोपारा परिसरात सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित महिला हि उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी असून तिच्या पतीसोबत वाद झाल्याने ती पुण्याला नोकरीच्या शोधात जात होती. यावेळी वसईतील नरेंद्र मोर्या या ओळखीच्या व्यक्तीने वसईत नोकरी लावतो (Crime News) असे सांगितले असल्याने पीडित महिला दोन दिवस पुण्यात राहून वसईला आली. 

Nalasopara Crime
Chandrapur News : शेतात काम करताना घडले भयंकर; मुसळधार पावसात विद्यूत तार तुटली, चौघांचा मृत्यू

नरेंद्र मोर्या याला भेटली असता त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर नरेंद्रने माझे मित्र नोकरी लावून देतील असे खोटे आश्वासन देऊन प्रकाश सिंग, पंचराज सिंग यांची भेट घालून दिली. पीडित महिलेचा फायदा घेत या दोघांनी देखील तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. या घडल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ मुख्य संशयित आरोपी नरेंद्र मोर्या, प्रकाश सिंग, पंचराज सिंग या तिघांना अटक केली. त्यांना वसई न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com