Hingoli Crime News
Hingoli Crime NewsSaam tv

गतिरोधकावर गाडीचा वेग कमी होताच साधली संधी; प्रवास करणाऱ्या महिलेला लुटले

गतिरोधकावर गाडीचा वेग कमी होताच साधली संधी; प्रवास करणाऱ्या महिलेला लुटले
Published on

हिंगोली : रस्‍त्‍यावरून दुचाकीने पतीसोबत दुचाकीवरून प्रवास सुरू होता. रस्‍त्‍यावर गतिरोधक आल्‍याने गाडीचा वेग कमी केला. याची संधी साधत चोरट्याने महिलेच्या हातातील बॅग हिसकावून (Crime News) लाखो रुपयांचे दागिने लुटण्याचा धक्कादायक प्रकार (Nanded) नांदेड– हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. (Tajya Batmya)

Hingoli Crime News
Shirpur: गांजाची शेती उध्वस्त; मका, कापूस पिकात लागवड

महामार्गावर झालेल्‍या या प्रकाराने खळबळ (Hingoli) उडाली आहे. घटनेतील फिर्यादी शेषराव गारोळे हे पत्नीसोबत गावाकडे जात होते. यावेळी शिवनी पाटीजवळ गतिरोधक असल्याने गारोळे यांनी गाडीचा वेग कमी केला. याच वेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी संधी साधत दागिन्‍यांची बॅग लंपास केली आहे.

चोरट्यांचा शोध सुरू

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावर भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेप्रकरणी कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचे पथक चोरट्यांच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com