फायनान्स कंपनीच्या वसुलीचा आणखी एक बळी; हिंगोलीतही वसुली कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरूच

Hingoli Farmer End His Life : फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वसुलीचा तगादा सुरुच आहे.अशातच वसुली करणारे कर्मचारी शेतकऱ्यांना दमदाटी करून धमकावत असल्यानं एका 28 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केलीय. मात्र या आत्महत्येनंतर मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुरु असलेली पिळवणुक कशी समोर आलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Hingoli Farmer End His Life
Hingoli farmer suicide case linked to alleged loan recovery pressuresaam tv
Published On: 
Summary
  • हिंगोलीतील २८ वर्षीय शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे.

  • या प्रकरणात फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीच्या कथित दबावाचा मुद्दा उपस्थित

  • वसुली कर्मचाऱ्यांकडून दमदाटी आणि धमकावल्याचे आरोप

नांदेडमध्ये फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच आता लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातूनही खासगी फायनान्स कंपन्यांच्या जुलमी वसुलीचे प्रकार समोर येतायत. लातूर जिल्ह्यातील राणी अंकुरगा येथे एका 28 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं खासगी फायनान्स आणि बँकेच्या तगाद्याला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केलीय. सुसाईट नोटमध्ये शेतकऱ्यानं थेट कंपनीला जबाबदार धरल

दुष्काळी परिस्थितीमुळे मी कर्जात असून मला फायनान्स त्रास देतायत. मी आत्महत्या करण्यास मजबूर झालोय. मला आणि माझ्या परिवाराला त्रास होऊ नये अशी सरकारला विनंती आहे. माझे लोन माफ करा. माझ्या कुटुंबाला काहीतरी मदत करा. घरातल्या कर्ता पुरुषानेच फायनान्सच्या जाचामुळे असं आयुष्य संपवल्यानं आता जगायचं कसं हा प्रश्न कुटुंबापुढे उभा ठाकलाय.

Hingoli Farmer End His Life
दुष्काळानं घेतला शेतकऱ्यांचा बळी, 24 तासांत राज्यातील 4 शेतकऱ्यांची आत्महत्या

दुसरीकडे हिंगोलीलही मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तगाद्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीचा कर्मचारी वसुलीसाठी घरासमोर उभा ठाकतो आणि कशी अरेरावी करतो ते पाहा. ही एक उदाहरण झालं असे प्रकार अनेक गावात बिनदिक्कतपणे सुरू आहेत. परभणी, नांदेडमध्येही फायनान्स कंपन्याना कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैशांसाठी दमदाटी करू नये अन्यथा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा थेट इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

Hingoli Farmer End His Life
शेतकरी कर्जमाफी योजनेतून ९४ हजार शेतकऱ्यांना वगळलं; ४६ हजार ठरले अपात्र,काय आहे कारण?

दुष्काळी परिस्थितीमुळे वसुली थांबवण्याचे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून आणि घरासमोर जाऊन त्रास दिला जातोय. मात्र आता शेतकऱ्यानी केलेल्या आत्महत्येनंतर तरी प्रशासन प्रत्यक्षात कंपन्यांवर कठोर कारवाई करणार की फायनान्स कंपन्याच्या चक्रव्युहात असेच बळी जात राहणार ? हा खरा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com