Mahadev Jankar News: 'तर मी मुख्यमंत्री झालो असतो...' ओबीसी एल्गार सभेत महादेव जानकरांचे मोठं विधान

OBC MahaSabha hingoli: अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभा होत आहे. सभेत बोलताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाने डिमांडर होण्यापेक्षा कमांडर व्हावे.. असे म्हणत मराठा आरक्षणावर टीका केलीयं.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSaam tv
Published On

OBC Elgar Sabha Hingoli:

अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभा होत आहे. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर होणाऱ्या या महासभेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर यांच्यासह राज्यातील विविध समाजाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. या सभेत बोलताना रासपचे नेते महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाने डिमांडर होण्यापेक्षा कमांडर व्हावे.. असे म्हणत मराठा आरक्षणावर टीका केली.

काय म्हणाले महादेव जानकर?

"ओबीसींनी ठरवलं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेत जायचं नाही. व्हायचं तर आमदार आणि खासदारच व्हायचं. ओबीसींनी ठरवलं तर यांना झेंडा धरायलासुद्धा माणसं मिळणार नाहीत. ओबीसींनी जागरुन होऊन आपल्या हक्कासाठी जागरुन राहिलं पाहिजे..." असे आवाहन महादेव जानकर (Mahadev jankar) यांनी केले.

तसेच "छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष काढला असता तर महादेव जानकर इथे मुख्यमंत्री म्हणून आला असता. छोट्या लोकांना तिकीट मागायला कशायला जायचं? आम्ही कमांडर आहोत. ओबीसींनी खासदार किंवा आमदार होईल हे ठरवा. जिल्हा परिषद, पंचायत समिती लढायच्या नाहीत... असेही महादेव जानकर यावेळी म्हणाले.

Mahadev Jankar News
Manoj Jarange Patil: भुजबळांनंतर सुषमा अंधारेंवर जरांगे पाटलांचा निशाणा; टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले...

तुमच्यासोबत युती करु..

"भुजबळ साहेब, आम्ही तुमच्याबरोबर युती करायला तयार आहोत. परंतु त्यांच्याबरोबर जाणार नाही. वंजारी, धनगर, माळी या समाजातून आपण पैसा उभा करु शकतो. तुम्ही आमचे माईलस्टोन नेते आहात. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ एकत्र आले असते तर क्रांती झाली असती.." असेही महादेव जानकर म्हणाले. (Latest Marathi News)

Mahadev Jankar News
Pune News: नामांतराचा विषय आता पुण्यात सुद्धा; महम्मदवाडीचे नाव 'महादेववाडी' करा, शिवसेना शिंदे गटाची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com