Wardha News: पाच वर्ग आणि शिक्षक फक्त एकच; संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला ठोकले कुलूप

Hinganghat Zilla Parishad School: अनेक गावांमध्ये आजही जिल्हा परिषदेच्या शाळांची भिषण परिस्थिती आहे.
Wardha News
Wardha NewsSaam TV

चेतन व्यास

School Lock:

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भवितव्य चांगले असावे असं स्वप्न प्रत्येक आई-वडील पाहतात. यासाठी मुलांना चांगल्यातील चांगली शाळा निवडून तिथे अॅडमीशन मिळवून देतात. मात्र गरीब कुटुंबातील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण घेतात. अनेक गावांमध्ये आजही जिल्हा परिषदेच्या शाळांची भिषण परिस्थिती आहे. (Latest Marathi News)

Wardha News
Pune Crime: दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश, तब्बल ५२ लाखांचे २०० मोबाईल लंपास, पुणे शहरात खळबळ

हिंगणघाट तालुक्याच्या धोची येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक न दिल्याने संतप्त झालेल्या गावाकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलं आहे. तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केलाय. या शाळेत पहिल्या वर्गपासून तर पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकारिता एकच शिक्षक आहे. एकच शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांना तेही सर्व विषय शिकवतात.

शाळेत शिक्षक देण्याची मागणी गावकऱ्यांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी निवेदनातून केली होती. मात्र या मागणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने गावाकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट शाळेला कुलूप ठोकले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अशी करण्यात येत आहे.

उद्याचे तरुण आणि सजग नादरिक घडवण्याची तयारी प्रथम शाळेतूनच होते. शाळेतून चांगले विद्यार्थी आणि उद्याचे नागरिक घडवले जातात. मात्र आजही जिल्हा परिषदेच्या काही शाळांची अवस्था फार दयनीय आहे. यामुळे मुलांचे भवितव्य देखील धोक्यात असल्याचं चित्र दिसत आहे.

Wardha News
Pune Crime: दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश, तब्बल ५२ लाखांचे २०० मोबाईल लंपास, पुणे शहरात खळबळ

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com