Maharashtra Weather: मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

IMD Alert For Maharashtra: हवामान खात्याने मान्सूनबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दाखल झाला आहे. आज याठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather: मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Weather UpdateSaam TV
Published On

राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला. पहिल्याच पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला. या पावसामुळे मोठं नुकसान झालं. आता मान्सून मराठवाडा आणि विदर्भातपर्यंत पहोचला आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ९ जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Weather: मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Heavy Rain : बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पुरात वृद्ध गेला वाहून, बीड जिल्ह्यातही पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून वेगाने पुढे सरकत संपूर्ण महाराष्ट्र व्यापताना दिसत आहे. मान्सून मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये मान्सून दाखल झाला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मान्सून पोहचला आहे. या सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे.

Maharashtra Weather: मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Pune Rain: शिरुरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, दुचाकीस्वारांचा धोकादायक पाण्यातून प्रवास, दुर्घटना घडण्याची भिती|VIDEO

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे पुढील २ दिवसांत मान्सून आणखी प्रगती करण्याची शक्यता आहे. राज्यात आज आणि उद्या अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होत जाईल.

तर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाटमाथा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Weather: मराठवाडा-विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Ashti Heavy Rain : आष्टी तालुक्यात धुवाधार पाऊस; सीना नदीच्या पुराचे पाणी शिरले गावात, शेती पिकाचे मोठे नुकसान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com