Cooperative Society Elections: सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सहकार विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Government Postpones Cooperative Society Elections : महाराष्ट्र सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Maharashtra Government Postpones Cooperative Society Elections
Cooperative society elections in Maharashtra postponed due to floods and heavy rainfall.saamtv
Published On
Summary
  • सहकार विभागानं राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या.

  • मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला.

  • ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्यात येणार नाहीत.

  • शेतकऱ्यांचे नुकसान आणि विस्कळीत जनजीवनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या.

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका निवडणुकांही बसलाय. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुरांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मोठी बातमी हाती आलीय. या निवडणुकांबाबत सहकार विभागानं मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळं सहकार विभागानं हा निर्णय घेतलाय. ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालंय. नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत, काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागानं सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील या परिस्थितीमुळे सहकार विभागाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Maharashtra Government Postpones Cooperative Society Elections
Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २० लाख एकर क्षेत्रावर पिकांचे नुकसान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

राज्यातील ३० जिल्ह्यात सरासरीच्या ८० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला असून त्यापैकी १५ जिल्ह्यात सरासरीच्या १००% पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील शेतीविषयक कामात व्यस्त असल्याने अशा शेतक-यांना ते सभासद असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Government Postpones Cooperative Society Elections
महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, -९६० चे कलम ७३ कब मधील तरतुदीनुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. दरम्यान राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयाकडून दि. २५/०७/२०२५ रोजी शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत. जेथे निवडणुकांची तयारी सुरू आहेत अशा सहकारी संस्थांची एकूण संख्या ३,१८८ आहे. त्यापैकी 'अ' व 'ब' वर्गातील सहकारी संस्थांची संख्या २८५ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com