हृदयद्रावक ! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून चालकाचा मृत्यू

रोटावेटर मध्ये अडकलेल्या मृतदेहाची अवस्था अक्षरशः छिन्नविछिन्न झाली होती.
हृदयद्रावक ! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून चालकाचा मृत्यू
हृदयद्रावक ! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून चालकाचा मृत्यूराजेश काटकर

परभणी : पूर्णा तालुक्यातील सुहागन येथे शेतात ट्रॅक्टर चालवताना रोटावेटरमध्ये अडकून भागवत भवानजी भोसले (वय ३० ) या चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुहागन येथील शिवारात बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सदरील घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. मयत भागवत भवानजी भोसले रा.सुहागन (ता.पूर्णा.) हे सोनाजी पावडे यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होते.

हे देखील पहा :

साहेब श्यामराव भोसले यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर (Rotavator) ने शेतीला रोटर करत असताना चालत्या ट्रॅक्टरच्या रोटावेटरमध्ये अडकून ट्रॅक्टर (Tractor) चालक भागवत भोसले यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रोटावेटर मध्ये अडकलेला मृतदेह (Death Body) अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत होता. शेतमालक शेतकरी साहेब श्यामराव भोसले यांनी घटनेची खबर मयताचे नातेवाईक व पोलीसांना (police) दिली.

हृदयद्रावक ! ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून चालकाचा मृत्यू
Sangli : प्रेमाच्या त्रिकोणातून दोन तरुणींसह एका तरुणाची आत्महत्या!

यानंतर पूर्णा (Purna) पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर मध्ये अडकलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला व घटनेची नोंद करत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी आकस्मित मृत्यू दाखल झाला असून पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा तपास सुरू आहे. भागवत भोसले यांच्या पश्चात आई, भाऊ , दोन मुलं असा परिवार आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com