डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; व्हिडिओतून धक्कादायक प्रकार समोर

व्हायरल व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तपास सुरू
डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार
डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार SaamTvNews

नंदुरबार : डाकीण (witch) असल्याच्या संशयावरुन एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा अतिशय दुर्दैवी प्रकार व्हायरल व्हिडीओमुळे (Video) समोर आला आहे. गेल्या आठ दिवसांपासुन नंदुरबारच्या (Nandurbar) सोशल मिडीयात हा व्हिडीओ व्हायरल होत असून याबाबत मोठी टिकेची झोड उठत आहे. बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे देखील पहा :

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (ANIS) जिल्हाधिकाऱ्यांना (Nandurbar collector) निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पिडीत महिला कोण याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत. या घटनेबाबत राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे अंनिसने स्पष्ट केले आहे.

डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेचा विवस्त्र करुन छळ; नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार
भोंगे लावून बेरोजगारी, महागाईचे प्रश्न सुटणार का?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातुनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडीओ कुठला आणि यातील संबंधीत महिला (Woman) कोण याचा छडा लागल्यानंतरचे सर्व चित्र स्पष्ट होईल.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com