भोंगे लावून बेरोजगारी, महागाईचे प्रश्न सुटणार का?; संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

भाजपचे महाराष्ट्रात नवा ओवेसी तयार करण्याचे काम सुरु असल्याचे राऊत म्हणाले.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv
Published On

मुंबई: काल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हनुमान जयंती निमित्त पुण्यात हनुमान चालिसाचे पठण केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुंबईत हनुमान जयंती साजरी केली. यावर भाजप व मनसेकडून टीका होतं आहेत. या टीकेला आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. 'शिवसेनेना (Shivsena) रामजन्मभूमीच्या लढाईत पहिल्यापासून आहे, प्रभु श्रीराम सर्वांचे आहेत, त्यामुळे कोणीही गेल्यास हरकत नाही. सर्वांनीच जायला पाहिजे, बाळासाहेब ठाकरे यांनी रामभूमीत मंदिर उभं करण्यासाठी खरा लढा निर्माण केला. अयोध्या आमचा राजकीय दौरा नाही, आमचा श्रध्देचा दौरा आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

आदित्य ठाकरे अयोध्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची येथील परिस्थिती पाहून तारीख ठरवणार आहे, असंही राऊत म्हणाले. विरोधकांकडून दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रमध्ये दंगली व तणाव निर्माण करण्याचा घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ओवेसीवर बोलताना राऊत म्हणाले, भाजप नवं हिंदूचा भूमिका येणाऱ्या लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नवीन ओवेसी तयार करत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये देखील अशाच पद्धतीने ओवेसी तयार करून भाजपने विजय प्राप्त केला असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. (Shivsena)

राज्यासमोर महागाई, बेरोजगारी हाच मोठा विषय आहे. उपासमारीने मृत्यूचे आकडे वाढले आहेत, युनोमध्ये हा विषय गेला आहे. भोंगे लावून बेरोजगारी, महागाई हे विषय सुटणार का ? तस असेल तर मला सांगा असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thorat) यांनी सुद्धा हा विषय उचलला होता. तेव्हाच काळ वेगळा होता, आता विकासावर बोलण्याची गरज आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती आधी घरात साजरी व्हायची. मूळ प्रश्नापासून लोकांना भटकविण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र योग्य दिशेने जातोय, काही लोक भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात दंगली होणार नाहीत

काल कोल्हापूरमध्ये लोकांनी दाखवून दिले आहे. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. राज्यात शिवसेनेसमोर भाजप तोकडा पडतोय त्यामुळे नवा ओवेसी, तयार करण्याचे काम सुरु आहे. विरोधकांना अस वाटत की माझ्या सभेवर दगड मारावेत पण, राज्यातील मुस्लिम हे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शांत आहेत. महाराष्ट्रात दंगली होणार नाहीत असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com