Gunaratna Sadavarte : जालन्यात मोठा गोंधळ; गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक

Jalna Gunaratna Sadavarte Attack News : जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकण्यात आल्याची घटना घडली. पत्नी आणि मुली गाडीत असताना झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
GUNARATNA SADAVARTE CAR ATTACK IN JALNA MNS WORKERS DETAINED
GUNARATNA SADAVARTE CAR ATTACK IN JALNA MNS WORKERS DETAINEDSaam Tv
Published On
Summary
  • जालन्यात गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली.

  • गाडीत त्यांच्या पत्नी आणि दोन मुली उपस्थित होत्या.

  • मनसेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे.

  • चंदनझिरा पोलिसांनी काही मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

  • राज ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर हा प्रकार घडल्याची चर्चा सुरू आहे.

जालन्यातून मोठी बातमी समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीवर जालन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकण्यात आल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे जालना शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विशेष म्हणजे ज्या गाडीत शाई फेकण्यात आली, त्या गाडीत सदावर्ते यांच्या पत्नी आणि दोन मुली देखील उपस्थित होत्या. त्यामुळे या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.ही घटना जालना शहरातील विशाल कॉर्नर परिसरात घडली.

GUNARATNA SADAVARTE CAR ATTACK IN JALNA MNS WORKERS DETAINED
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

गुणरत्न सदावर्ते हे आज जालना दौऱ्यावर आले असताना काही मनसैनिकांनी त्यांच्या वाहनाला लक्ष्य केले. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे (Rahul Ratnaparkhe) यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

GUNARATNA SADAVARTE CAR ATTACK IN JALNA MNS WORKERS DETAINED
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

तसेच चंदनझिरा पोलिसांनी मनसेच्या पाच ते सहा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षाचालकांच्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com