जालना : शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून, त्यानंतर ठाण्यातून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी छोटी आव्हानं स्वीकारत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. मात्र आता आदित्य ठाकरेंनी एकनाश शिंदे यांना नवं आव्हान दिलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बदलून दाखवावं असं आव्हान आता आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यपाल महापुरुषांचा अपमान करत आहेत. तरीही ते राज्यपाल पदावर आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपालांचं भाषण होण्याआधी त्यांना बदलून दाखवा. मात्र त्यांना बदलण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वरळीतील सभेवर बोलताना आदित्य यांनी म्हटलं की, कुणाचा फ्लॉप शो झाला त्यावर मी आनंद व्यक्त करणार नाही. वरळीने दाखवून दिलं आहे की गद्दारी कोणालाच पटलेली नाही.
कोळी बांधव काल भलत्याच राज्यातले होते, हे मी एका चॅनेलवर बघितलं. कालच्या सभेला खर्च्यांची गर्दी झाली होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री गुवाहाटीला झाडी, डोंगर बघायला गेले होते. तर डावोसला ते बर्फ बघायला गेले होते, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. 28 तासात 40 कोटी खर्च कसा झाला, असा प्रश्न मला पडला होता. त्यावर त्यांच्याशी चर्चा करावं म्हटलं, पण त्यांच्याकडून कोणतंय उत्तर आलं नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.