Sangli: अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उदघाटनावरुन राजकारण तापलं; संचारबंदी लागू

प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था ढासळू नये यासाठी संचारबंदी लागू केली आहे.
gopichand padalkar
gopichand padalkarsaam tv
Published On

सांगली : सांगलीमध्ये (sangli) अहिल्याबाई होळकर (ahilyabai holkar) यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा वरून भाजप (bjp) आणि राष्ट्रवादीत (ncp) जुंपली आहे. यावरून वाद आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीने दाेन एप्रिलला ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या (sharad pawar) यांच्या हस्ते अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाजपने त्याला शह देण्यासाठी येत्या रविवारी (ता. २७) मेंढपाळ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबत आमदार गाेपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी भुमिका जाहीर केली आहे. दरम्यान येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी प्रशासनाने अहिल्यादेवी स्मारक परिसरात आज मध्यरात्रीपासून दाेन एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. (gopichand padalkar latest marathi news)       

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले प्रशासनाने संचारबंदी लागू केली असली तरी आम्ही येत्या रविवारी अहिल्यादेवी होळकर स्मारकाचं उद्घाटन मेंढपाळांच्या हस्ते करणारच. आम्हांला रोखण्यासाठी पालकमंत्री सर्वोपरी प्रयत्न करीत आहेत. कुठल्या स्तरावर ते जाताहेत आम्हांला माहित आहे. तुमच्यात धमक आहे तर कार्यकर्ते पाठवा असा इशारा पडळकरांनी पालकमंत्र्यांना दिला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होऊ देणार नाही असे स्पष्ट केले. यावेळी पडळकरांनी पोलीस विभाग आणि प्रशासनास प्रकरण चिघळू देऊ नका अशी विनंती देखील केली आहे.

gopichand padalkar
Mumbai: 'मला काेण थांबवतेय पाहू? ठाकरेंची माफिया सेना की पवारांचे राडेबाज गुंड'

दरम्यान धनगर समाजाच्या नेत्याने असे वागणे बरं नाही. समाजाचे नेतृत्व करतात आणि त्यांच्यामुळे संचारबंदी लागते हे चांगले नाही. आपल्याच समाजातील लोकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नगरसेवक विष्णू माने यांनी उपस्थित केला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संचारबंदीत हाेणार एवढे दुर्भाग्य काय असणार असेही नगरसेवक माने यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

gopichand padalkar
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
gopichand padalkar
Phaltan: भाजप खासदारांवर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करा : आगवणेंचे मागणी
gopichand padalkar
Dabang: 'गुंडांच्या बंदोबस्तासाठी बंदूकीनं नव्हे तर गणेश नाईकांनी ठरवावं लागतं'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com