Digambar Aagvane
Digambar Aagvane saam tv

Phaltan: भाजप खासदारांवर आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल करा : आगवणेंचे मागणी

फलटण येथे आगवणे यांचे उपाेषण सुरु
Published on

सातारा : भाजपचे (bjp) फलटण माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी फलटण (phaltan) येथे दिगंबर आगवणे (digambar aagvane) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. (phaltan latest marathi news)

स्वराज कारखाना व स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले आणि पावती बनवून आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यांच्या विरोधात तालुक्यातील विविध नागरिकांनी माझ्याकडे सक्षम असे पुरावे आणून दिलेले आहेत. माझ्यासोबत तालुक्यातील अनेकांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केलेली असून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह कारखाना आणि पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे केलेली आहे.

Digambar Aagvane
Satara Breaking News: ग्रेड सेपरेटरमध्ये भीषण अपघात; तिघे जखमी

दरम्यान दिगंबर आगवणे यांनी नाना पाटील चौक येथून बुधवारी (ता.२३) भीक मांगो आंदोलनाला प्रारंभ करत अमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Digambar Aagvane
Lakshya Sen: 'ऑल इंग्लंड' नंतर बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत लक्ष्य सेनची आघाडी
Digambar Aagvane
Crime News: अभिषेकला सावध केल्याने तिघांनी नांदेडात गजेंद्र ठाकूरचा केला खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com