Lakshya Sen: 'ऑल इंग्लंड' नंतर बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत लक्ष्य सेनची आघाडी

थकव्यामुळे लक्ष्य सेनने स्वीस ओपन स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Lakshya Sen
Lakshya SenSaam tv

नवी दिल्ली : बॅडमिंटनपटू (badminton) लक्ष्य सेनने (Lakshya Sen) BWF च्या जागतिक क्रमवारीत नववे स्थान पटकाविले आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन (all england badminton championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत लक्ष्यला पराभव स्विकारावा लागला. या स्पर्धेत (competition) त्यास रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना लक्ष्यने मानांकन मिळवले. मंगळवारी (२२ मार्च) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत लक्ष्य सेनने ११ व्या स्थानावरुन नववे स्थान मिळविले आहे. (lakshya sen latest marathi news)

लक्ष्यच्या खात्यात ७४,७८६ गुण आहेत. त्याने सध्याचा जगज्जेता सिंगापूरच्या लो कीन य्यूला मागे टाकले. ऑल इंग्लंड फायनलमध्ये सेनला ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनकडून सरळ पराभव पत्करावा लागला हाेता.

Lakshya Sen
SAFF U-18 Championship: भारतीय संघाची बांगलादेशवर मात; नितू लिंडानं नाेंदविला Goal

दरम्यान सेनने स्विस ओपनमधून (swiss open) माघार घेतली आहे. थकव्यामुळे त्याने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Lakshya Sen
Yavatmal: वाऱ्हा कवठ्यात दबा धरून बसलेल्या वाघाचा तिघांवर हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com