Weather Alert: राज्यासाठी पुढील 4 दिवस महत्त्वाचे; या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळणार, IMD अलर्ट

Maharashtra Rain Alert: राज्यात येत्या चार ते पाच दिवसात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Good News IMD Predicts Heavy Rainfall next 4-5 days In Maharashtra Mumbai Pune Weather Alert
Good News IMD Predicts Heavy Rainfall next 4-5 days In Maharashtra Mumbai Pune Weather Alert Saam TV
Published On

Maharashtra Rain Latest Updates: ऑगस्ट महिन्यात राज्यावर रुसून बसलेला पाऊस सप्टेंबरमध्ये पुन्हा सक्रिय झाला. मागील आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. अशातच येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

Good News IMD Predicts Heavy Rainfall next 4-5 days In Maharashtra Mumbai Pune Weather Alert
ICC ODI Ranking: आशिया कप जिंकूनही टीम इंडियाचं नुकसान; पाकिस्तानला झाला मोठा फायदा

नव्या आठवड्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर (Weather Alert) समाधानकारक असेल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण अधिक असेल, तर मुंबईसह कोकणात देखील धुव्वाधार पाऊस होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पाऊस

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसासाठी पोषक (Rain Updates) वातावरण तयार झालं आहे. कोकणासह मुंबईत अधून मधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. घाटमाथ्यावरही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे.

महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, आज म्हणजेच सोमवारी देखील राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. याशिवाय धरणांमधील पाणीसाठा देखील वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

Edited by - Satish Daud

Good News IMD Predicts Heavy Rainfall next 4-5 days In Maharashtra Mumbai Pune Weather Alert
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना 'धनुष्यबाण' परत मिळणार? शिवसेना पक्ष अन् चिन्हावर आज 'सुप्रीम सुनावणी'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com