Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Good News For Farmers: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना फडणवीस सरकार दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट देणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Good News For FarmersSaam Tv
Published On: 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

  • दिवाळीपूर्वी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा होणार

  • सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार

  • शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे दिवाळीआधी जमा होणार

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधी ५ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना तातडीने ही आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली. दिवाळीआधी पैसे मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 'आधी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. आता ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. ४० तालुके नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. गेल्या २५ वर्षांत राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर केला जात होता. त्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जात होती. पण यावेळी आपण लवकर दुष्काळ जाहीर केला. यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढण्यात आला. आज सप्लीमेंटरी जीआर काढला. आम्ही १२ योजना लागू केल्या आहेत.'

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

मुख्यमंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, 'मंत्रिमंडळ बैठकीत आज शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा केली. दिवाळी जवळ आली असून यंदा शेतकऱ्यांसाठी दिवाळी अडचणीची आहे. त्यावर आम्ही मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रातून मदत आल्यावर शेतकऱ्यांना जी मदत करायची ती केली जाईल. पण आता तातडीचा दिलासा म्हणून आणि त्यातील अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी ५००० रुपये दिवाळीपूर्वी आम्ही देणार आहोत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात काही तरी रक्कम असावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली जाणार आहे. दिवाळीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.'

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Government: मोठी बातमी! आदिवसी विद्यार्थ्यांना दिलासा, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com