

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता.
संभाव्य फेरबदलात अनेक नव्या खासदारांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते.
महाराष्ट्रातील काही खासदारांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा.
मोदी सरकारमधील फेरबदलांबाबत चर्चा सुरू असतानाच, मंत्रिपदांमधील संभाव्य बदलांची यादी समोर आलीय. हा मंत्रिमंडळ फेरबदल रविवारी किंवा सोमवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे.
मंत्रिमंडळाच्या चर्चानंतर कोणत्या खासदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल याची चर्चा सुरू झाली आहे. या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी साम टीव्हीच्या हाती आली असून यात कोणत्या खासदारांना मंत्रिपद मिळणार, महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागले हे जाणून घेऊ.
शक्तिकांत दास — पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर. ते मंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील होण्याची आणि अर्थ मंत्रालयाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.
श्रीकांत शिंदे (शिवसेना) – यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते. शिवसेना (यूबीटी) च्या सहा खासदारांना एनडीएच्या गोटात आणल्याबद्दल त्यांना हे पद मिळण्याची शक्यता आहे.
अनुराग ठाकूर (हिमाचल प्रदेशातील हमीरपूरचे भाजप खासदार) – यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
अरुण गोविल (मेरठचे भाजप खासदार) – दूरदर्शनवरील 'प्रभू राम' चे पात्र निभावणारे अरुण गोविल यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
राघव चढ्ढा किंवा अशोक मित्तल - यातील एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार (बिहारचे माजी मुख्यमंत्री)—पंतप्रधान मोदी जेडी(यू)च्या या प्रमुखांना आपल्या मंत्रिमंडळातही सामील करून घेऊ शकतात.
संजय दिना पाटील – ठाकरे गटातून शिंदे गटात आल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
विष्णूदत्त शर्मा (खजुराहोचे भाजप खासदार) – यांही मोदी सरकारमध्ये स्थान मिळू शकते.
तरुण चुघ — भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) प्रभावी स्थान असलेले नेते आहेत. यांनाही यावेळी सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
जनार्दन सिंग सिग्रीवाल (महाराजगंज, बिहार येथील भाजप खासदार) — त्यांनाही मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
निर्मला सीतारामन – त्यांना अर्थ मंत्रालयातून शिक्षण मंत्रालयात हलवले जाण्याची शक्यता आहे.
मनोहर लाल खट्टर – त्यांना ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी सोडावी लागू शकते. ही जबाबदारी एखाद्या नवीन मंत्र्याकडे सोपवली जाऊ शकते. मात्र, त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालय कायम राहू शकते.
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री. मंत्रिमंडळातून ज्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, त्यापैकी ते एक प्रमुख नाव आहेत.
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
रवनीत सिंग बिट्टू -
हे सध्या रेल्वे आणि अन्न प्रक्रिया मंत्रालयांमध्ये राज्यमंत्री आहेत. मात्र, त्यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली असताना आणि वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) पुन्हा जाण्याची संधी न मिळाल्याने, त्यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाऊ शकते. यासह आणखी सुमारे अर्धा डझन राज्यमंत्र्यांना सरकारमधून हटवले जाण्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.