Gondia News: NEET परीक्षेचा निकाल पाहिला अन्‌ रात्रीच विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

NEET परीक्षेचा निकाल पाहिला अन्‌ रात्रीच विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
NEET Exam Result Gondia News
NEET Exam Result Gondia NewsSaam tv
Published On: 

शुभम देशमुख

गोंदिया : नीट परीक्षेच्या निकाल रात्री उशिरापर्यंत अकरा वाजता लागला. घरातील सर्व झोपी गेले होते. नीट परीक्षेत (NEET Exam) कमी मार्क मिळाले. त्यामुळे (Gondia) नैराश येऊन तिने रात्रीच बंद खोलीत टोकाचे पाऊल उचलत आयुष्‍य संपविले. (Tajya Batmya)

NEET Exam Result Gondia News
Jalgaon News: शाळेचा पहिला दिवस ठरला आयुष्याचा अखेरचा दिवस; प्रार्थना म्‍हणतानाच झाले होत्‍याचे नव्‍हते

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सलोनी गौतम (वय १७) असे या विद्यार्थिनीने नाव असून तिने आपलं आयुष्य संपवलं. ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्टर व्हावं हे स्वप्न असतं त्यांच्यासाठी नीटची परीक्षा फार महत्त्वाची असते. नीट परीक्षेत स्कोअर झाला नाही, तर चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणं कठीण होत. त्यामुळे नीटला चांगले मार्क मिळावेत यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस झटत असतात. मात्र स्कोअर कव्हर न झाल्याने नैराश्य येतं आणि टोकाचं पाऊल उचललं जातं. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे.

NEET Exam Result Gondia News
Radhakrishna Vikhe Patil News: त्‍यांचे मानसिक संतुलन बिघडलय, आधारहीन आरोप करण्याची सवय; महसूलमंत्री विखे पाटलांचा राऊतांवर पलटवार

रात्री निकाल लागला अन्‌

नीट परीक्षेचा निकाल आज (१३ जून) लागला. त्यानंतर गुण पाहिल्यावर विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीन सरकली. अभ्यास करुनही मार्क कमी मिळाल्याचा धक्का सहन झाला नाही. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तिने पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com