Gold Rate Today: दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा ३५००० रुपयांनी महागले; वाचा २२ आणि २४ कॅरटचे दर

Gold- Silver Rates Rise Again: सोनं-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली. दिवाळीच्या आदल्या दिवशी सोनं-चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Gold Rate Today: दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा ३५००० रुपयांनी महागले; वाचा २२ आणि २४ कॅरटचे दर
Gold- Silver Rates Rise Again meta ai
Published On: 
  • आजचा सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली

  • दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी

  • एका तोळ्यामागे सोन्याच्या दरात ३५०० रुपयांची वाढ

  • १ किलो चांदी १०,००० रुपयांनी महागली

संजय महाजन, जळगाव

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला. दिवाळीत सोनं-चांदी स्वस्त होईल अशी आशा ग्राहकांना होती. पण सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. आज सोनं-चांदी महागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आज १ तोळा सोन्याचे दर ३,५०० रुपयांनी वाढले. तर १ किलो चांदी १०,००० रुपयांनी महाग झाली.

दिवाळीच्या आदल्या दिवशीच सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण होत होती पण आता या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज २४ कॅरेटचे १ तोळा सोनं १,४१,५०० रुपयांना विकले जात आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं १,२९,६१५ रुपयांना विकले जात आहे. तर १ किलो चांदी १,९०,००० रुपयांना विकली जात आहे. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

Gold Rate Today: दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा ३५००० रुपयांनी महागले; वाचा २२ आणि २४ कॅरटचे दर
Gold Price Today : दिवाळीपूर्वी ग्राहकांसाठी गुड न्यूज! चांदी तब्बल २ हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचे दर

३ नोव्हेंबरचे सोनं-चांदीचे दर-

२२ कॅरेट - १,२६,४०० रुपये

२४ कॅरेट - १,३८,००० रुपये

१ किलो चांदी - १,८०,००० रुपये

४ नोव्हेंबरचे सोनं-चांदीचे दर-

२२ कॅरेट - १,२९,६१५ रुपये

२४ कॅरेट - १,४१,५०० रुपये

१ किलो चांदी - १,९०,००० रुपये

Gold Rate Today: दिवाळीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ, १० तोळा ३५००० रुपयांनी महागले; वाचा २२ आणि २४ कॅरटचे दर
Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा वधारले! २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.