दिवाळीच्या आधी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा परिणाम भारतीय मार्केटवर झाला आहे. आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरांमध्ये वाढ नोंदवली गेली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला आता अधिक झळ बसणार आहे. अंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणीतील वाढ यामुळे सोन्याच्या दरात ही वाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांचा अंदाज आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर:
२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम २७ रुपयांची वाढ झाली त्याची किंमत १३,९९१ रुपये झाली आहे. तर प्रति तोळा २४ कॅरेटचे सोनं २७० रूपयांनी महागले आहे. त्यामुळे १ तोळा सोन्यासाठी आता १,३९,९१० रुपये मोजावे लागत आहेत. तर १० तोळं सोन्याची किंमत १३,९९,१०० रुपयांवर पोहोचली आहे.
२२ कॅरेट सोन्याचा दर:
दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली. प्रति तोळा २५० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम २५ रूपयांनी वाढून १२,८२५ रुपयांवर पोहोचले आहेत. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,२८,२५० रुपये झाला आहे. तर ८ ग्रॅमसाठी १,०२,६०० रुपये आणि १०० ग्रॅमसाठी १२,८२,५०० रुपये मोजावे लागत आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर:
हलक्या आणि डिझायनर दागिन्यांसाठी लोकप्रिय असलेल्या १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम २० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर आता १०,४९३ रुपये प्रति ग्रॅम झाला असून १० ग्रॅमसाठी १,०४,९३० रुपये दर आकारला जात आहे.
मागील १० दिवसांमधील सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम):
Nov 04, 2026: २४ कॅरेट - ₹१३,९९१ (+२७), २२ कॅरेट - ₹१२,८२५ (+२५)
Nov 03, 2026: २४ कॅरेट - ₹१३,९६४ (+२७), २२ कॅरेट - ₹१२,८०० (+२५)
Nov 02, 2026: २४ कॅरेट - ₹१३,९३७ (+४९), २२ कॅरेट - ₹१२,७७५ (+४५)
Nov 01, 2026: २४ कॅरेट - ₹१३,८८८ (०), २२ कॅरेट - ₹१२,७३० (०)
Oct 31, 2026: २४ कॅरेट - ₹१३,८८८ (-३३८), २२ कॅरेट - ₹१२,७३० (-३१०)
Oct 30, 2026: २४ कॅरेट - ₹१४,२२६ (-१६९), २२ कॅरेट - ₹१३,०४० (-१५५)
Oct 29, 2026: २४ कॅरेट - ₹१४,३९५ (०), २२ कॅरेट - ₹१३,१९५ (०)
Oct 28, 2026: २४ कॅरेट - ₹१४,३९५ (+६६), २२ कॅरेट - ₹१३,१९५ (+६०)
Oct 27, 2026: २४ कॅरेट - ₹१४,३२९ (+५४), २२ कॅरेट - ₹१३,१३५ (+५०)
Oct 26, 2026: २४ कॅरेट - ₹१४,२७५ (+१७), २२ कॅरेट - ₹१३,०८५ (+१५)
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र १ नोव्हेंबरपासून चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. चांदीच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत. आजही सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर वाढले पण चांदी मात्र जैसे थेच राहिली. आज १ ग्रॅम चांदीचा भाव २०० रुपये, १० ग्रॅमचा भाव २,००० रुपये, तर १ किलो (१००० ग्रॅम) चांदीची किंमत २,००,००० रुपयांवर कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.