Gold Price Today : दिवाळीपूर्वी ग्राहकांसाठी गुड न्यूज! चांदी तब्बल २ हजारांनी स्वस्त, पाहा सोन्याचे दर

Jalgaon Gold Rate Today: दिवाळीच्या तोंडावर सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Gold Price Today
Gold Price Todaysaam tv
Published On: 

सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करताय? मग जळगावच्या सुवर्ण बाजारातले आजचे दर तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. पण आठवड्याच्या सुरुवातीला दरांमध्ये काहीसा बदल पाहायला मिळाला. सोमवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाल्यानंतर मंगळवारीही सोनं महागलं आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ

जळगावच्या सुवर्णबाजारात सोमवारी २ नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३८ हजार ५०० रुपये होता. हा दर जीएसटी वगळून होता. मात्र, मंगळवारी सोन्याच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३८ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू असताना आता पुन्हा दरवाढ झाल्याचं चित्र आहे.

Gold Price Today
Shani Vakri 2027 : २०२७ मध्ये शनीची उलटी चाल! १३८ दिवस या ५ राशींच्या आयुष्यात मोठी उलथापालथ

चांदीच्या दरात दोन हजारांची घसरण

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली होती. मात्र, मंगळवारी चांदीच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची घट झाली. त्यामुळे सोमवारी १ लाख ८३ हजार रुपये प्रति किलो असलेली चांदी आता एक लाख ८२ हजार रुपयांवर आली आहे. हे दर जीएसटी वगळून आहेत.

Gold Price Today
8th Pay Commission : 8व्या वेतन आयोगाला एक वर्ष पूर्ण! आता पगारवाढीसाठी किती महिने थांबावे लागणार? अपडेट आली समोर

दिवाळीपूर्वी खरेदीदारांना दिलासा मिळणार?

आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोनं आणि चांदीच्या किमतींवर होत असतो. त्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. आगामी दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक सोनं-चांदी खरेदीचं नियोजन करत आहोत.

विशेषत: दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची पंरपरा अनेक कुटुंबांमध्ये आहे. अशा परिस्थितीत चांदीच्या दरातली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते. मात्र, सोन्याचे दर पुन्हा वाढू लागल्यावर खरेदीदारांचं लक्ष आता बाजारातल्या पुढच्या बदलांकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.