Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold-Silver Price Today: जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजचे 18k- 22k आणि 24k चे दर किती ते वाचा...
Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price DropSaam Tv
Published On
  • जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात घसरण

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १००० रुपयांची घसरण

  • २४ कॅरेट सोन्यापाठोपाठ २२ आणि १८ कॅरेटचं सोनं झालं स्वस्त

  • आज १ किलो चांदीच्या दरात देखील २००० रुपयांची घसरण

संजय महाजन, जळगाव

गणेशोत्सवात सलग चौथ्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सकाळी सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १००० रूपयांनी कमी झाले. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची ग्राहकांना सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदीचे दर घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सुवर्ण बाजारात आठवड्याच्‍या सुरूवातीला दोन ते तीन दिवस भाव स्थिर होते. यामुळे खरेदीदारांना सोनं-चांदी खरेदीची मोठी संधी होती. परंतू २ दिवसांपासून दरात चढउतार होत असल्‍याचे चित्र आहे. आज २४ कॅरेटच्या एक तोळा सोन्याच्या दरामध्ये १००० रुपयांची घसरण झाली. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १०,००० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीचे दर २००० रूपयांनी कमी झाले आहेत.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात मोठा बदल

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारात होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात मागील काही महिन्यांपासून सातत्‍याने सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. यात आठवड्याच्‍या सुरवातीला २ दिवस सोनं-चांदीचे भाव स्‍थिर राहिले होते. परंतु, दरात पुन्‍हा मोठी वाढ होऊन दर वधारले होते. दरम्‍यान आज सोनं आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Price: ग्राहकांना झटका! सोनं-चांदी आणखी महागणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

बुधवारी २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव विना जीएसटी १ लाख ५१ हजार ५०० रुपयांवर होता. त्यात गुरुवारी १००० रूपयांची घसरण होऊन सोन्याचे दर १ लाख ५० हजार ५०० रुपयांवर आले. तर चांदी २००० रुपयांनी स्‍वस्‍त झाली असून चांदीचे भाव विना जीएसटी २ लाख ३४ हजार रुपयांवरून दोन २ लाख ३२ हजार रुपयांवर आले आहेत.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर
Gold Rate Today : गौरी आगमनाला सोनं झालं स्वस्त, प्रतितोळा सर्वात मोठी घसरण; २४, २२ अन् १८ कॅरेटचे नवीन दर जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com