Milk Price : गोकुळचा दूध उत्पादकांना मोठा दिलासा; गाय-म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ, नवे दर जाणून घ्या

gokul milk price increase august 11 : गोकुळने दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली आहे. ११ ऑगस्टपासून हे सुधारित दर लागू होतील.
गोकुळचा मोठा निर्णय, दूध खरेदी दरात वाढ
गोकुळने दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. saam tv
Published On
Summary
  • गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा

  • म्हैस दूध खरेदी दरात १.५०, तर गाय दूध दरात १ वाढ

  • ११ ऑगस्टपासून नवे दर लागू

  • दूध उत्पादकांना महिन्याला तब्बल ५ कोटींचा अतिरिक्त फायदा

  • म्हैस दूध खरेदी दर ५५, तर गाय दूध खरेदी दर ३७ प्रति लिटर

रणजीत मांजगावकर, साम टीव्ही | कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ने दूध उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे. गोकुळकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. ११ ऑगस्टपासून हे सुधारित दर लागू होणार आहेत.

म्हैस आणि गाईच्या दूध दरात वाढ करण्यात आल्याने गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याला सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे. ६ फॅट आणि ९ एसएनएफ गुणप्रतिच्या म्हशीच्या दूधाचा खरेदी दर ५३ रुपये ५० पैशांवरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुणप्रतिच्या गाईच्या दूधाचा खरेदी दर ३६ रुपयांवरून ३७ रुपये करण्यात आला आहे.

गोकुळचा मोठा निर्णय, दूध खरेदी दरात वाढ
Maharashtra Milk Price Hike: सर्वसामान्यांना फटका! गाई-म्हशीचं दूध 2 रूपयांनी महागलं; कधीपासून होणार दरवाढ लागू?

गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरातही प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून, गाय दुधाच्या विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. चाऱ्याची उपलब्धता, दूध उत्पादनातील चढ-उतार आणि वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गोकुळकडून सांगण्यात आलं आहे. गोकुळशी संलग्न सुमारे साडेसात हजार प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज १४ ते १५ लाख लिटर दूध संकलित केलं जातं.

गोकुळचा मोठा निर्णय, दूध खरेदी दरात वाढ
Turmeric Milk Benefits : रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com