

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने बाजी मारली.
गोकुळच्या २५ जागांसाठी निवडणूक झाली.
सतेज पाटील यांच्या आघाडीने १४ जागा जिंकल्या.
कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाच्या सत्तेला विशेष महत्त्व असते. सत्तेत असणाऱ्या नेत्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पकड मिळवण्यास मोठी संधी निर्माण होते. गोकुळच्या निवडणुकीच्या विजयाचा परिणाम थेट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समिती इ.) निवडणुकांवर होत असतो, अशा महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बंटी ऊर्फ सतेज पाटील यांनी महायुतीला चीतपट केलंय.
महायुतीचे मातब्बर मंत्री निवडणुकीचं मैदाना मारण्यासाठी उतरले असताना सतेज पाटलांनी या निवडणुकीत कडवी झुंज दिली. गोकुळच्या २५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी १३ जागांची आवश्यकता असते. त्यात सतेज पाटलांच्या आघाडीने आघाडी घेत थेट १४ जागां पटकावल्या आहेत. सतेज पाटलांनी जोरदार मुसंडी मारत गोकुळ दुध संघावर झेंडा फडकावला आहे.
सतेज पाटील यांनी दूध उत्पादक शेतकरी आणि ठरावधारकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत निवडणुकीच्या मैदानात ताकद लावली. दुसरीकडे, गोकुळची सत्ता कायम राखण्यासाठी महायुतीनेही सर्व ताकद पणाला लावली होती. जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या पाठबळासह महायुतीने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. राज्य पातळीवरील नेतृत्वाचेही महायुतीला समर्थन मिळाले होते. परंतु बंटी पाटलांनी डाव हाणून पाडत महायुतीला चीतपट केलं.
1 तायशेटे अभिजीत प्रभाकर शिट्टी - २,०८० मतं
2 राजेश नरेसिंहराव पाटील कपबशी - १,७७७
3 राहुल पी. एन. पाटील कपबशी - १,९७३
4 रणजित के. पी पाटील कपबशी - १,७४६
5 रणजीत दिलीप पाटील कपबशी - १,७७६
6 अंबरीशसिंह संजय घाडगे कपबशी - १,८७७
7 चेतन अरुण नरके कपबशी - १,९६६
8. अजित शशिकांत नरके कपबशी - १,९२४
9 अजित पांडुरंग पाटील कपबशी - १,७१८
10 गुरबे विद्याधर बाबुराव कपबशी - १,८०९
11 मंडलिक विरेंद्र संजय कपबशी - १,८१८
12 शशिकांत पाटील चुयेकर शिट्टी - २,०४५
13 बाबसाहेब चौगले शिट्टी - १,८२८
14 अभिजीत तायशेटे शिट्टी - २,०८०
15 किसन चौगले शिट्टी - १,९०३
16 राहुल देसाई शिट्टी - १,८१८
17 बाबसाहेब विष्णू देवकर शिट्टी - १,७९४
18 सचिन दौलतराव घोरपडे शिट्टी - १,७०२
19 जाधव विश्वजीत दिनकरराव शिट्टी -
20 अंजना रेडेकर शिट्टी - १,६८७
21 भाग्यश्री डोंगळे शिट्टी -
22 शशिकांत शामराव खोत शिट्टी
23. राजूबाबा जयंतराव आवळे शिट्टी
24. बयाजी देवू शेळके शिट्टी
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.