Gokul Chairman Election: अखेर गोकुळवर महायुतीची सत्ता; राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष

Gokul Milk Union Gets New Chairman : आता बातमी आहे, लोकशाहीला 4 संचालकांचे खांदे देणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीची.गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आलीय. महायुती आणि समविचारी आघाडीत सत्तेतसाठी कसा रस्सीखेच सुरु होता? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Rajesh Patil elected as the new chairman of Gokul Milk Union
Rajesh Patil elected as the new chairman of Gokul Milk Union
Published On: 

कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थकारण आणि राजकारण ज्याच्याभोवती फिरते, त्या 'गोकुळ' दूध उत्पादक संघावर अखेर महायुतीच्या राजेश पाटलांची अध्यक्ष म्हणून निवड झालीय. 4 शासननियुक्त सदस्यांचा वाद पेटलेला असतानाच कोर्टाच्या निर्णयानंतर 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत महायुतीच्या राजेश पाटलांना 16 तर सतेज पाटलांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत चुयेकरांना 13 मतं मिळाली. त्यामुळे अध्यादेशानंतर मागल्या दारानं आलेल्या 4 शासननियुक्त सदस्यांनी महायुतीला डोळे झाकून मतदान केल्याचं स्पष्ट झालं.या निवडीनंतर सतेज पाटीलही आक्रमक झाले. तर चुयेकरांनी शासननियुक्त सदस्यांवरून थेट कोर्टात जाणार असल्याचं सांगितलयं.

मात्र 9 सप्टेंबरला सहकार विभागानं गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते 10 नोव्हेंबरच्या अध्यक्ष निवडीच्या घडामोडींपर्यंत गोकुळवरील सत्तेसाठी सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीत आणि महायुतीत कशी रस्सीखेच सुरु होती? पाहूयात.

9 सप्टेंबर 2026

गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सहकार विभागाकडून जाहीर करण्यात आला

4 ऑक्टोबर 2026

संचालकपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 9 भाजप आणि शिंदेसेनेला प्रत्येकी 7 तर जनसुराज्य शक्तीला 2 जागा मिळालाय...

6 ऑक्टोबर 2026

महायुतीकडून बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधकांना 4 जागा देण्याची ऑफर

11 ऑक्टोबर 2026

सतेज पाटलांची गोकुळच्या निवडणुकीतून माघार न घेण्याची भूमिका, 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' गोकुळच्या मैदानात

दरम्यान मंत्री हसन मुश्रीफांनी कर्नाटकातील सौंदत्तीची शपथ देऊन मतदारांना मतदान करण्याचा आवाहन केलं...तरीही १८ ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला 12 जागा मिळाल्या... मंत्री हसन मुश्रीफांचे सुपूत्र नविद मुश्रीफ, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे, विश्वास पाटील यांचा गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर

25 ऑक्टोबर 2026

14 संचालकांचा कोरम पूर्ण करण्यासाठी महायुती आणि सतेज पाटलांच्या आघाडीकडून हालचालींना वेग

29 ऑक्टोबर 2026

सतेज पाटलांचे 13 संचालक गोकुळमध्ये दाखल, महायुतीच्या 12 संचालकांनी बैठकीला जाणं टाळलं

अध्यक्षनिवडीसाठी 14 जागांचा कोरम पूर्ण न झाल्यानं समविचारी आघाडीच्या चुयेकरांची निवड रखडली

30 ऑक्टोबर 2026

महायुतीकडून अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग

2 नोव्हेंबर 2026

हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं 10 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता संचालकांची सभा घेऊन निवडणूक

प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

3 नोव्हेंबर 2026

गोकुळ दूध संघात 4 शासन नियुक्त सदस्यांचा समावेश करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला

4 नोव्हेंबर 2026

4 शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरून सतेज पाटलांसह समविचारी आघाडी आक्रमक

6 नोव्हेंबर 2026

अध्यक्षपदासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली

एकीकडे महायुती अध्य़क्षपदासाठी प्राणपणाला लावून लढत असताना दुसरीकडे कोल्हापुरपूरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थेवर कब्जासाठी आम्ही प्रयत्न करत नाही.. कोरमसाठी 4 शासननियुक्त सदस्यांची निवड केली, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं.दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जरी गोकुळसाठी सरकार प्रयत्नशील नसल्याचं म्हटलं असलं तरी महायुतीचे नेते गोकुळसाठी आग्रही होते.

9 नोव्हेंबरला एकीकडे सतेज पाटलांनी संघर्ष मोर्चा काढून गोकुळवरील शासननियुक्त सदस्यांच्या नियुक्तीला विरोध केला तर दुसरीकडे संभाजीनगर खंडपीठानं शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला आणि 10 नोव्हेंबरला शासननियुक्त सदस्यांनी महायुतीच्या राजेश पाटलांच्या बाजूनं मतदान केलं.अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सरकारनं सहकार कायद्यात बदल करून लोकशाही प्रक्रियेलाच सुरुंग लावला असल्याची टीका होतेय..मात्र आता उद्या या निर्णयाविरोधात समविचारी आघाडी न्यायालयात गेली तरी लोकशाहीला हे 4 संचालकांचे खांदे कुठवर घेऊन जातील, हे येणारा काळच ठरवेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.