Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा

Trimbakeshwar Pegalwadi Road Potholes: त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी ते गोहिरेवाडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरवस्था शाळकरी विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करत मांडली.
Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा
Trimbakeshwar Pegalwadi road potholesSaam Tv
Published On
  • त्र्यंबकेश्वरमध्ये विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यांची केली पोलखोल

  • खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी झाली अवस्था

  • बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्याचे अनोखे रिपोर्टिंग

  • पेगलवाडी ते गोहिरेवाडी रस्त्याची दुरवस्था

  • विद्यार्थ्यांनी व्यथा मांडल्यानंतर प्रशासनाने घेतली दखल

राज्यभरात रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश:चाळण झाली आहे. या खड्ड्यामुळे नागरिक, वाहन चालक यांच्यासोबत विद्यार्थी देखील त्रस्त झाले आहेत. शाळेमध्ये जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना या खड्डेमय रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागते. राज्यभरातील या खड्ड्यांच्या समस्येची साम टीव्हीने गंभीर दखल घेत नेक्स्ट जनरेशन रिपोर्टर हा अनोखा उपक्रम सुरू केल आहे. याल राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत नाशिकमधील जनरेशन अल्फाने सरकारने केलेल्या रस्त्यांच्या कामाची पोलखोल केली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पाण्याच्या बाटलीला माईक बनवून एका विद्यार्थ्याने रिपोर्टिंग करत रस्त्यांच्या दुरावस्थेची पोलखोल केली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी ते गोहिरेवाडी दरम्यानच्या अत्यंत खड्डेमय झालला आहे. या बिकट रस्त्याचा आढावा घेत या विद्यार्थ्याने अनोख्या अंदाजात रिपोर्टिंग केले आहे. शाळेत जाताना या रस्त्यावरून प्रवास करताना कशी समस्या येते ते या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा
Gen Alpha Club : शाळेत रंगला निवडणुकीचा धुरळा अन् मिळाली पहिली 'महिला मुख्यमंत्री', नेमकं प्रकरण काय?

आदित्य कोयरे या विद्यार्थ्याने रिपोर्टिंग करताना त्र्यंबकेश्वरमधील या रस्त्याची अवस्था कशी झाली ते दाखवलं आहे. यावेळी एका विद्यार्थिनीने सांगितले की, पेगलवाडी हे आमचं छोटसं गाव आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. इकडे कुणी लक्ष पण देत नाही. सरकारने इकडे लक्ष दिले पाहिजे. आम्हाला शाळेत जायला त्रास होतो. आमचे कपडे सगळे चिखलाने माखून जातात. आमची हिच इच्छा आहे की आमचे रस्ते चांगले व्हायला पाहिजे.'

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा
Gen Alpha Club :हे रस्ते की बंजी जंपिंग?’ साम टीव्हीवर नेक्स्ट जनरेशन रिपोर्टरने पालिकेचा विकास रस्त्यावर आणला|VIDEO

पेगलवाडी येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुरावस्थेची व्यथा मांडली होती. याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांनी पेगलवाडी रस्त्याची पाहणी केली. प्रशासनाला तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बांधकाम विभागाने पेगलवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली. त्याचसोबत आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेगलवाडी रस्त्याची पाहणी केली. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पेगलवाडीत जाऊन विद्यार्थ्यांसोबतच आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.

Gen Alpha Club: 'रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते', त्र्यंबकेश्वरमध्ये रस्त्याची दुरवस्था, बाटलीचा माईक बनवून विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा
Gen alpha club: 'बस सुरू करा, नाहीतर आमचं शिक्षण थांबेल'; जालन्यातील विद्यार्थिनींचा थेट रस्त्यावर उतरून सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com