Gen Alpha Club : शाळेत रंगला निवडणुकीचा धुरळा अन् मिळाली पहिली 'महिला मुख्यमंत्री', नेमकं प्रकरण काय?

Gen Alpha, School Election : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाथ्री येथील राजर्षी शाहू विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवडणूक पार पडली. इयत्ता दहावीतील स्वराली पवार हिची शाळेच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदी निवड झाली.
Female student elected chief minister in a school election.
Gen Alpha students celebrate their school election victory.साम टीव्ही मराठी
Published On

Gen Alpha School Election News : 'जनरेशन झी'च्या (Gen Z) एक पाऊल पुढे असणाऱ्या 'जनरेशन अल्फा'ने (Gen Alpha) माहौल केलाय! झेन अल्फा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून शाळेला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली आहे.

खालील व्हिडीओतील ही दृश्ये कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या जल्लोषाची नसून, शाळेत पार पडलेल्या 'विद्यार्थी संसदे'च्या निकालानंतरची आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील राजर्षी शाहू विद्यालयात ही निवडणूक पार पडली असून, शाळेला पहिली महिला मुख्यमंत्री मिळाली आहे.

Female student elected chief minister in a school election.
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी Good News, खात्यात पैसे येण्यास सुरूवात, तब्बल ३१९ कोटींचा निधी वर्ग

राजर्षी शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (पाथ्री, ता. फुलंब्री) येथे 'विद्यार्थी संसदेची' निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून दहावीतील विद्यार्थिनी स्वराली काकाराव पवार ही 'मुख्यमंत्री' म्हणून निवडून आली. तर रुद्र दिगंबर जाधव, समर्थ संतोष कापडे, आदित्य एकनाथ इंगळे, प्रतीक इंद्रजीत चित्रक आणि राधिका संतोष कापडे हे विद्यार्थी विविध खात्यांचे मंत्री म्हणून मताधिक्याने विजयी झाले.

Female student elected chief minister in a school election.
MLA Pension : आमदारांची पेन्शन बंद होणार? नागपूर कोर्टात मोठा दावा; मोठी अपडेट आली समोर

विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सहसचिव वरूणभैय्या पाथ्रीकर, जिल्हा परिषद सदस्या गीतांजली पाथ्रीकर आणि मुख्याध्यापक डॉ. बी. के. पाथ्रीकर यांनी अभिनंदन केले. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नितीन काथार, वाय. बी. सोनवणे, पी. डी. बखरे, एस. पी. दाभाडे, एस. के. निकम आणि व्ही. एस. पाटील यांनी पार पाडली. या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com