Ganpati Festival : गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय! स्वस्तात एसटीचं तिकीट बुक करता येणार

Ganpati Festival Ticket Booking : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. संपूर्ण एसटी बस आरक्षित म्हणजेच ग्रुप बुकिंग करताना आकारले जाणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क यंदा रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना तुलनेने स्वस्तात एसटी बस आरक्षित करता येणार आहे.
Ganpati Festival : ST बुकिंग स्वस्तात ! ३०% अतिरिक्त शुल्क रद्द; गणेशभक्तांना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
Ganpati Festival : ST बुकिंग स्वस्तात ! ३०% अतिरिक्त शुल्क रद्द; गणेशभक्तांना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय META AI
Published On
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने हजारो गणेश भक्तांना दिलासा

गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला आहे. चाकरमान्यांची गणपतीसाठी गावी जाण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. रेल्वे बुकिंग, बसची बुकिंग तीन महिन्याआधीच फुल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने आरक्षित एसटी बुकींगमधील अतिरिक्त कर रद्द केले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. आता संपूर्ण एसटी बस आरक्षित ( ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यांत येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना स्वस्तात एसटी बसने प्रवास करता येईल. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

गणेशोत्सव आणि एसटीचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी हजारो कोकणवासी एसटीने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे ५ हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Ganpati Festival : ST बुकिंग स्वस्तात ! ३०% अतिरिक्त शुल्क रद्द; गणेशभक्तांना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
Railway Accident : हायकोर्टाचा मोठा निर्णय! रेल्वेत चढताना पडून मृत्यू झाला तरी भरपाई मिळणार

कोकणवासीय आणि गणेशोत्सव मंडळांकडून अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतची निवेदनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. कोकणवासीयांच्या मागणीचा विचार करून उप मुख्यमंत्र्यांनी हे अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार यंदा एकेरी गट आरक्षणावर ( ग्रुप बुकिंगवर) कोणतेही ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाकडून लवकरच जारी करण्यात येईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Ganpati Festival : ST बुकिंग स्वस्तात ! ३०% अतिरिक्त शुल्क रद्द; गणेशभक्तांना मोठा दिलासा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
Mumbai : मुंबईकरांच्या खिशाला फटका! रिक्षा टॅक्सीच्या दरात वाढ; 'इतक्या' रुपयांनी महागणार

एसटीला अतिरिक्त खर्च

हे शुल्क रद्द करण्यात आल्याने एसटी महामंडळावर येणारा अतिरिक्त आर्थिक भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com