चंद्रपूरचा गांधी चौक बनला आंदोलनाचा आखाडा

चंद्रपूरच्या गांधी चौकात आज जबरदस्त राजकीय धुमश्चक्री बघायला मिळाली. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने केली.
चंद्रपूरचा गांधी चौक बनला आंदोलनाचा आखाडा
चंद्रपूरचा गांधी चौक बनला आंदोलनाचा आखाडासंजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर
Published On

चंद्रपूर : चंद्रपूरच्या गांधी चौकात आज जबरदस्त राजकीय धुमश्चक्री बघायला मिळाली. स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने केली. याचे कारण ठरले ते अपक्ष आमदारांच्या यंग चांदा ब्रिगेड कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजप आणि मनपाविरुद्ध पुकारलेले 'दे धक्का आंदोलन'. (Gandhi Chowk of Chandrapur became the arena of agitation)

हे देखील पहा -

मनपातील गैरव्यवहारांच्या विरोधात आज आमदार जोरगेवार यांचे आंदोलन असताना भाजपनेही आमदारांविरुद्ध आंदोलनाची तयारी केली. गेल्या काही महिन्यांत मनपातील सत्ताधारी भाजपच्या कारभारातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्याची घोषणा आमदारांनी केली होती आणि त्यासाठी आज गांधी चौकात आंदोलन घोषित केले. याला उत्तर देण्यासाठी भाजपनेही गांधी चौकात मंडप उभारून आंदोलनाची तयारी केली. आमदारांच्या 200 युनिट मोफत वीज देण्याच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी भाजपने हे आंदोलन केले.

चंद्रपूरचा गांधी चौक बनला आंदोलनाचा आखाडा
"मायबाप सरकार आता तरी मंदिराची दार उघडा"

आज सकाळपासून दोन्ही आंदोलकांनी गांधी चौकात अवैध भाषण मंडप उभारले होते. वाढता तणाव बघता पोलिसांनी कोरोना नियमावलीचा आधार घेत हे मंडप काढून टाकण्याची कृती केली. भाजपने आपले आंदोलन पोलीस बळाचा वापर करून दडपले जात असल्याचा आरोप केला. अपक्ष आमदाराने चंद्रपूरकरांना 200 युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाच्या विरोधात भाजपने जोरदार नारेबाजी केली. पोलिसांनी महापौर व इतर भाजप नेत्यांसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांना अटक केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com