Crime News
Crime Newssaam tv

Chandrapur News : अपेक्षांच्या ओझ्याचा बळी? अभ्यासाच्या दबावातून नववीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं

Chandrapur Student End life : विद्यार्थ्यांच्या या आत्महत्येने पालक वर्तुळात मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.

Chandrapur News : चंद्रपुरात नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील ख्यातनाम खाजगी मिशनरी शाळेत नववीत शिकत असलेल सार्थक याने घरीच टेरेसवर गळफास लावून घेत आत्महत्या केली.

सकाळी घरातील सर्व सदस्य जागे झाल्यावर हा प्रकार लक्षात आला. मात्र तोवर उशीर झाला होता. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अभ्यासाचा प्रचंड दबाव व शाळा-कोचिंग क्लासेस यातील गृहपाठ कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया त्याच्या पालकांनी दिली आहे. (Maharashtra News)

Crime News
Uddhav Thackeray meet Ajit Pawar : अजित पवारांचं कौतुक अन् शिंदे-फडणवीसांवर निशाणा, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

प्रकरण पोलिसात (Police) नोंद झाले असून पोलिसांनी शहरातील हनुमान खिडकी भागातील रहिवासी असलेले त्याचे कुटुंबीय आणि शाळेतील शिक्षक यांचे जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे. पालकांच्या मते तो अभ्यासात साधारण होता. मात्र सार्थक अभ्यास व स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव यामुळे पुरता कोलमडला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Crime News
BMC Street Furniture Scam: मुंबई महापालिकेतील स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांमार्फत चौकशी करा, आदित्य ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

नववीतील विद्यार्थ्यांच्या या आत्महत्येने पालक वर्तुळात मात्र चिंता व्यक्त केली जात आहे. सार्थकने अशा पद्धतीने जगाचा निरोप घेतल्याने शाळेत देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस चौकशीतून नक्की काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Crime News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com