Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Gadchiroli Flood Alert: गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील 25 प्रमुख रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Gadchiroli Flood Alert:
Gadchiroli Rain Havoc: 25 Major Roads and Highways Closed for Trafficsaam tv
Published On
Summary
  • गडचिरोलीत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत.

  • जिल्ह्यातील 25 प्रमुख रस्ते, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद.

  • नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक पुलांवरून पाणी.

गणेश शिंगाडे, साम प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल २५ प्रमुख रस्ते, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

Gadchiroli Flood Alert:
School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

मुसळधार पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा आणि आष्टी–आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गांसह कुरखेडा, एटापल्ली, धानोरा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, भामरागड आणि गडचिरोली तालुक्यातील अनेक राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवर पाणी आले आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने पुलांवरून पाणी वाहत असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Gadchiroli Flood Alert:
Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २५ प्रमुख मार्ग बंद असल्याची माहिती दिली आहे. प्रशासनाने नागरिकांना पूर आलेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. भामरागड तालुक्यातील सुमारे ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १२३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काही भागांत २०० मिलीमीटरपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. छत्तीसगडमधील मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूराचा धोका लक्षात घेऊन भामरागडमधील सुमारे ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था आश्रमशाळा व अन्य सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एसडीआरएफसह पोलीस, महसूल आणि इतर यंत्रणा सतर्क असून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com