राज्यात ४२ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पुढील ३ महिने मोफत धान्य; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra free ration scheme latest news : महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य मिळणार आहे.
Maharashtra free ration scheme latest news
Maharashtra free ration scheme latest news Saam TV News
Published On: 

Maharashtra farmers free ration eligibility : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांतील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना पुढील तीन महिने प्रत्येकी पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षत्येखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १४ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय झाला.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या निर्णयानुसार, प्रत्येक व्यक्तीला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू याप्रमाणे धान्य दिले जाईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील आणि डिबीटी (DBT) योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.