धुळे महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. या महापालिकेद्वारे बड्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. आज गल्ली क्रमांक 2 मधील चार दुकाने महापालिकेच्या वसूली विभागाकडून सील करण्यात आली आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला वेग दिला आहे. वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकान सील केली जात आहेत. आज महापालिकेच्या जप्ती पथकाने जप्तीची कारवाई केली आहे.
ज्या मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही अशा थकीत मालमत्ता कर धारकांनी तात्काळ मालमत्ता कर भरून कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.