VIDEO : 10 वर्षांनी बाळ झालं, पण घरी परतण्याआधीच भयंकर घडलं; तरुणांच्या एका चुकीने चौघांनी जग सोडलं
छत्रपती संभाजीनगर : १० वर्षांनंतर बाळ झालं, कुटुंबियांनी थाटामाटात बारसं केलं. पण घरी परतण्याआधीच वाटेतच भयानक घडलं. एकाच कुटुंबातील चौघांना मृत्यूने गाठलं. मन सुन्न करणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात घडली. बारशाहून परतताना एका कुटुंबियांच्या कारला भरधाव स्कॉर्पियोने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये नवजात बाळासह त्याची आई, मोठी बहीण आणि आजीचा जागीच मृत्यू झाला.
मृणाली अजय देसरकर , आशालता हरिहर पोपळघट,अमोघ देसरकर (दीड महिने) आणि दुर्गा सागर गीते 7 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर अजय देसरकर असं अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देसकर कुटुंबिय अमरावती येथील रहिवासी असून सध्या ते पुण्याला राहतात. त्यांच्या घरात १० वर्षांनी बाळ झालं.
बाळाचं बारसं करण्यासाठी देसकर कुटुंबिय पुण्याहून अमरावतीला आले होते. थाटामाटत बारसं आटोपल्यानंतर ते कारने पुण्याच्या दिशेने निघाले. मात्र, शनिवारी सकाळच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात त्यांच्यावर काळा घातला. दारु पिऊन सुसाट गाडी चालवणाऱ्या तरुणांनी देसरकर यांच्या कारला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.या भीषण अपघातात आजी,आईसह दीड महिन्याच्या चिमुकला आणि सात वर्षे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही तरुणांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण आणि कृष्णा कारभारी केरे यांना पोलिसांनी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.