Wai Fire News : आठवडी बाजारा दिवशी वाईच्या बाजारपेठेत भीषण आग

ही आग लागताच नागरिकांनी एकजूट दाखवत अन्य व्यावसायिकांच्या दुकानातील साहित्य अन्यत्र नेले.
wai, fire, fire brigade
wai, fire, fire brigadesaam tv
Published On: 

Wai News : वाई येथील मुख्य बाजारातील एका दुकानाला आज भीषण आग लागली. वाईचा सोमवार आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत माेठी गर्दी हाेती. त्यातच आग लागल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. (Maharashtra News)

wai, fire, fire brigade
Heramb Kulkarni News: समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला; गाडी रोखून रॉडने मारहाण

ही आग लागताच स्थानिकांनी दुकानाकडे धाव घेतली. अनेकांनी आग लागल्याच्या शेजारील दुकानातून साहित्य हलविले. यावेळी बघ्यांची माेठी गर्दी झाल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण हाेत हाेते.

आग विझविण्यासाठी पालिका प्रशासन, पोलीस दल आणि अग्निशामक दल (fire brigade) घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझविण्यासाठी या यंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत दुकानातील साहित्यांचे माेठे नुकसान झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

wai, fire, fire brigade
Nitesh Rane vs Sanjay Raut : शकुनी मामा, सूर्याजी पिसाळने घराघरांत आग आणि काड्या लावणे बंद करावे; नितेश राणेंचा संजय राऊतांना टाेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com