पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालाय. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईला सामोरं जावं लागणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती गगनाला भिडल्यात. साखरेच्या दरानं चक्क 80 रुपयांवर मजल मारल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. एव्हंढच नाही तर, वाढत्या दरामुळे बजेट कोलमडल्यानं नागरिकांनी थेट सरकारकडे मागणी केलीये. तर ग्राहकांनी साखर खरेदीकडे पाठ फिरवल्यानं विक्रेतेही मेटाकुटीला आलेत...
राज्यातील विविध जिल्ह्यांत साखर प्रतिकिलो किती रुपयांनी विकली जातेय तेही पाहूयात...
साखर महागली
(दर किलोमध्ये)
नागपूर - 70 रु.
बुलढाणा - 80 रु.
वाशिम - 80 रु.
यवतमाळ 78 रु.
कोल्हापूर - 75 रु.
परभणी - 70 रु.
सांगली - 80 रु.
सातारा- 70 रु.
नाशिक - 75 रु.
पुणे - 72 रु.
पालघर- 70 रु.
मुंबई - 65 रु.
तर दुसरीकडे, साखरेनंतर आता मुंबईकरांचा रोजचा प्रवासही महाग होणार आहे. ऑटो-टॅक्सीच्या भाडेवाढीचा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागणार आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे 1 रुपयाने तर टॅक्सीचे भाडे 2 रुपयांनी वाढणार आहेत.
नव्या दरानुसार, रिक्षाचे किमान भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे. साखर, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ कमी म्हणून की काय, येत्या 3-4 महिन्यांत मोबाईल रिचार्ज दर 12 ते 15 टक्क्यांनी महागणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे सर्वसामान्यांचं दैनंदिन व्यवहाराचं गणित बिघडणार आहे. खरंतर, याआधी आखाती युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीनं संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला होता. आता पुन्हा साखर, रिक्षा-टॅक्सी आणि मोबाईल रिचार्जमुळे महागाईचा झटका बसलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.