सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी
FDA raid on Sangamner Golden Market : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील प्रसिद्ध 'गोल्डन मार्केट' मध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पोलीस ताफ्यासह अचानक छापा टाकला. त्या ठिकाणी पोलिसांना जे आढळले ते पाहून अधिकारीही चक्रावून गेले. या छाप्यादरम्यान थेट 'पाकिस्तान कनेक्शन' उघडकीस आले. पाकिस्तानात तयार होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचा मोठा साठा एफडीकडून जप्त करण्यात आला आहे. दुकानदार शाहीद रियाज शेख ( वय 36 ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बाजारात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेल्या या सौंदर्यप्रसाधनांवर स्पष्टपणे “Made in Pakistan” असा उल्लेख आढळून आला. मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानल्या जाणाऱ्या 'गोरी ब्युटी क्रीम' आणि 'गोरी डे अँड नाईट क्रीम' चा यामध्ये समावेश आहे. भारतामध्ये विक्रीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही हा साठा अहिल्यानगरमध्ये कसा पोहोचला? याचा शोध आता एफडीए आणि पोलीस प्रशासन घेत असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
संगमनेर शहरात पाकिस्तानात तयार होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांची (Beauty Products) बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे एफडीएच्या धाडीत उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संगमनेर शहरातून १४ हजार रुपयांचा 'Made in Pakistan' सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे.
या कारवाईदरम्यान पाकिस्तानात तयार होणारी आणि मानवी आरोग्यास अत्यंत घातक मानली जाणारी 'गोरी ब्युटी क्रीम' (Gori Beauty Cream) आणि 'गोरी डे अँड नाईट क्रीम' हस्तगत करण्यात आली आहेत. भारतामध्ये विक्रीसाठी कोणतीही वैध परवानगी नसतानाही हे घातक प्रॉडक्ट्स विकले जात होते. याप्रकरणी दुकानदाराला ताब्यात घेण्यात आले असून संगमनेर शहर पोलिसांत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.