चायनीज फूड स्टॉल्स तुकाराम मुंढेंच्या रडारवर? चायनीज खाद्यपदार्थांकडे लक्ष देण्याचा विचार

Tukaram Mundhe Signals Action Against Chinese Food: FDA च्या धडक कारवायांमुळे राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणलेत. त्यातच आता FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी पुढील कारवाईसंदर्भात संकेतही दिलेत. त्यामुळे भेसळखोरांनंतर आता पुढचा नंबर कुणाचा आहे?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
FDA CRACKDOWN IN MAHARASHTRA: CHINESE FOOD STALLS UNDER SCANNER, SAYS TUKARAM MUNDE
FDA CRACKDOWN IN MAHARASHTRA: CHINESE FOOD STALLS UNDER SCANNER, SAYS TUKARAM MUNDEsaam tv
Published On

राज्यात अन्न भेसळ, प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि अस्वच्छ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAनं धडक कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि आस्थापनांचे परवानेही रद्द केलेत. हॉटेल्स, अन्नभेसळखोर आणि औषध माफियांच्या विरोधातील कारवाईनंतर आता मुंढेंच्या रडारवर चायनीज फूड स्टॉल्स येण्याची शक्यता आहे. तसे संकेत त्यांनी पुण्यातील एका मुलाखतीदरम्यान दिलेत... मुंढे नेमकं काय म्हणालेत ते पाहूया...

महत्त्वाचं म्हणजे, राज्यभरात चायनीज फुडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. शहरांमध्ये रस्त्यांवर चायनीझ गाड्यांची चलती आहेत. चायनीज फूडमधील काही घटक आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय...

खरंतर, चायनिज खाणं आता इतकं लोकप्रिय झालं आहे की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आवडीने खातात. मात्र, आता एफडीए या खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील चायनीज फूड विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत. त्यामुळे आगामी काळात मुंढे चायनीज खाद्यपर्दांवरची पहिली धाड कुठे टाकतात ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com