Latur Crime : ६ वर्षांच्या चिमुरडीची जन्मदात्या बापाकडून हत्या; नंतर स्वत:ही संपवलं जीवन, लातूरमधील घटना

Latur Crime News in Marathi : लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीला जन्मदात्या बापानेच गळफास दिल्याचा प्रकार केला आहे. त्यानंतर जन्मदात्या बापाने स्वत:ही जीवनही संवपलं आहे.
Latur Crime
Latur CrimeSaam tv
Published On

संदीप भोसले, लातूर

latur Crime News :

लातूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीला जन्मदात्या बापानेच गळफास दिल्याचा प्रकार केला आहे. त्यानंतर जन्मदात्या बापाने स्वत:ही जीवनही संवपलं आहे. लातूरच्या मोतीनगर भागात धक्कादायक ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातल्या मोतीनगर भागात स्वतःच्या 6 वर्षाच्या मुलीला गळफास देत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर स्वतःही व्यक्तीने घरातच फाशी घेत जीवन संपवलं आहे. (Latur Latest News In Marathi)

Latur Crime
Pune Crime News : मैत्रिणीसाठी ९वीच्या मुलांमध्ये वाद; गैरसमजातून मित्राची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या

नेमकं काय घडलं?

आज बुधवारी सकाळी लातूर शहरातल्या मोतीनगर भागात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच लातूरच्या गांधी चौक पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला आहे. यात मृत अभय भुतडा वय (35 ) वर्ष या निर्दयी बापाने पोटच्या सहा वर्षीय चिमुकलीला गळफास दिला आहे. तर स्वतःही घरातच गळफास घेत स्वतःच जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पुढील तपास हा गांधी चौक पोलीस करत आहेत.

Latur Crime
Dhule Crime News : मद्य वाहतुक प्रकरणी धुळे एलसीबीकडून तिघांना अटक, 36 लाख 89 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीने अत्याचारानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात घडली होती. या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तीन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राजकीय आश्रय मिळत असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

या केसेमध्ये फास्टट्रॅक कोर्टमध्ये चालवण्याबरोबरच महिलांसाठी विशेष स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्थानिकांनी सुद्धा पुढे येऊन सगळी माहिती दिली पाहिजे, असं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com