
भरत मोहोळकर, साम टिव्ही
जालना : ही संतापाची लाट आहे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात. कारण शेतकऱ्यांच्या मुलांच्या अंगावर कपडे आणि पायातले बूट हेसुद्धा माझ्यामुळेच असल्याचं सांगत आई, बहीण आणि बायकोविषयी मग्रुरीची भाषा त्यांनी वापरलीय.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, लाडक्या बहीणी, वृद्धांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजना कुठल्या पक्षासाठी नाही तर सर्वांसाठी असतात. मात्र, लोणीकरांनी माझ्यामुळे आणि मोदींमुळेच तुम्हाला योजनांचा लाभ मिळतो, असं म्हणत सरंजामशाही मानसिकता दाखवलीय. तर राऊतांनी मात्र मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचलाय. दुसरीकडे लोणीकरांच्या वक्तव्यावरुन सरकारवर टीकेची झोड उठल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच लोणीकरांचे कान टोचलेत.
बंगल्याचं वीज कनेक्शन कापल्याने महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी
जिल्हा बँकेत उपाध्यक्षपद न दिल्याने टोपेंना फोनवर शिवीगाळ केल्याची क्लीप व्हायरल
2020
पाणीपुरवठा मंत्री असताना तहसीलदारांचा हिरॉईन म्हणून उल्लेख
सरकारी योजना या जनतेच्या कराच्या पैशातून राबवल्या जातात. एवढंच नाही तर आमदार, खासदारांचं पेन्शनही जनतेच्या टॅक्समधूनच दिलं जातं. मात्र, लोकशाहीत मालक असलेल्या जनतेला भिकारी समजण्याइतका मग्रूरपणा लोकप्रतिनिधींमध्ये येतो तरी कुठून? या अशा सरंजमशाही मानसिकतेच्या नेत्यांना आता जनतेनेच त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.