Maharashtra Politics : हिंदी सक्तीवरून राजकारण तापलं; ठाकरे बंधूंचा एकच सूर, मोर्चाच्या तारखा वेगवेगळ्या, वाचा स्पेशल रिपोर्ट

hindi language row : हिंदी सक्तीवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Maharashtra Political News :
raj and uddhav thackeray Saam tv
Published On

हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात रणशिंग फुंकलंय. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकच सूर आळवत असेल तरी दोन्ही पक्षांनी आंदोलनाच्या तारखा मात्र वेगवेगळ्या जाहीर केल्या आहेत.

Maharashtra Political News :
Prakash Ambedkar : अचानक 76 लाख मतांची भर, विधानसभेची निवडणूक पारदर्शक होती का? प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल

राज्यात पहिलीपासून त्रिभाषिक सुत्रानुसार हिंदी सक्ती करण्यात आली. त्याला मनसे आणि ठाकरे गटाने विरोध केलाय. तर आता पावसाळी अधिवेशनाच्या आधी 5 जुलै रोजी राज ठाकरेंनी हिंदीसक्तीविरोधात मोर्चाचं तर 7 जूलै रोजी ठाकरे गटाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

Maharashtra Political News :
Pune Crime : नवऱ्याकडून ५ कोटी पोटगी मिळाली, दुसरं लग्न करायला निघाली; पण साडेतीन कोटी गमावले, नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे मतभेद विसरण्यास तयार असल्याचं वक्तव्य केलं होतं.. तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला... मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर युतीच्या चर्चांना ब्रेक लागला होता.. आता मात्र दोन्ही पक्षांचं हिंदीसक्तीला विरोध या मुद्द्यावर एकमत झालंय. तर राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरेंना आंदोलनासाठी आमंत्रण देणार अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मोर्चाला हजेरी लावणार की दोन आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे बंधूंचे मार्ग वेगवेगळे होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com