Crop Damage : अतिवृष्टीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं; पिकं सडली, बळीराजा ढसाढसा रडला, राज्यात कुठे-कुठे झालं नुकसान? पाहा व्हिडिओ

Crop Damage News : अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. पुरामुळे पिकं सडल्याने बळीराजा ढसाढसा रडला आहे. राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
अतिवृष्टीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं; पिकं सडली, बळीराजा ढसाढसा रडला, राज्यात कुठे-कुठे झालं नुकसान? पाहा व्हिडिओ
Crop DamageSaam tv
Published On

मुंबई : कधी सुल्तानी तर कधी अस्मानी संकटानं पिचलेल्या बळीराजाचं पुन्हा कंबरडं मोडलं आहे. कारण ठरलाय धो...धो..बरसणारा पाऊस....राज्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर पिक पाण्याखाली गेलंय. खरीप हंगाम हातचा गेल्यानं बळीराजाला अश्रू अनावर झालेत.

मराठवाडा, विदर्भात नुकसानीची दाहकता जास्त आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 11 लाख 67 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. सर्वाधिक नुकसान नांदेड आणि परभणीत झालंय.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालंय. 45 हजार हेक्टर पाण्याखाली गेलंय. हातातोंडाशी आलेलं मका पीक उद्धवस्त झालेलं पाहून शेतकऱ्यानं शेतातच टाहो फोडलाय.

जालना

जालन्यात अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठ नुकसान झालंय. 1 लाख 76 हजार हेक्टरचं नुकसान झालंय. आमदार आदित्य ठाकरे यांनी मोसंबी उत्पादकांशी संवाद साधताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले.

अतिवृष्टीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं; पिकं सडली, बळीराजा ढसाढसा रडला, राज्यात कुठे-कुठे झालं नुकसान? पाहा व्हिडिओ
Nagpur Flood: नागपुरात 10 हजार घरांमध्ये शिरलं पाणी, 3 जणांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 50 हजारांची मदत जाहीर

धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालंय. 285 गावात सोयाबीन, उडीद, मूग, मकासह कांद्याचे नुकसान झालंय.

परभणी

परभणीत सुमारे तीन लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालंय. कापूस, सोयाबीनची माती झालीये. पालकमंत्री संजय बनसोडे यांनी पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात 2 लाख 58 हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, हळद पिकांचे नुकसान झालं आहे. पीक पाण्याखाली गेल्यानं मायबाप सरकार मदत द्या, अशी आर्त हाक शेतकऱ्यानं दिली आहे.

नांदेड

नांदेडमध्ये सर्वाधिक 3 लाख 34 हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. 45 महसूल मंडळे प्रभावित झाली आहेत. नांदेड शहर, अर्धापूर, हदगाव, देगलूर, मुदखेड, कंधार, लोहा आणि नायगाव मध्ये नुकसान झालंय.

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळात 3 दिवसांपासून मुसळधार झालाय. कपाशी, सोयाबिन, मका, उडीद, मुगाचं अतोनात नुकसान झालंय.

यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालंय.जिल्हाधिकाऱ्यांनी पुसदच्या पूरग्रस्त भागात शेताची पाहणी केली. तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिलेत.....

अतिवृष्टीनं मोडलं शेतकऱ्यांचं कंबरडं; पिकं सडली, बळीराजा ढसाढसा रडला, राज्यात कुठे-कुठे झालं नुकसान? पाहा व्हिडिओ
Hingoli Flood: हिंगोलीमध्ये पुराचा धोका वाढला, नदीच्या पुराचा डोंगरगावला वेढा; पाहा व्हिडिओ

जळगाव

जळगांव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात टोमॅटोचं नुकसान झालंय.तर जामनेर तालुक्यात शेतात पाणी साचल्यानं कपाशीचं मोठे नुकसान झालेले आहे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. त्यामुळे महायुती सरकार बळीराजाला आधार देणार की वाऱ्यावर सोडणार याकडे बळीराजाच्या नजरा लागल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com