Talathi Recruitment : १५ लाखांत तलाठी नोकरीचा सौदा, बनावट भरती रॅकेटचा पर्दाफाश, महाराष्ट्रात उडाली खळबळ

Talathi Recruitment Scam : बनावट नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण आणि लॅपटॉप देऊन बेरोजगार तरुणांकडून तब्बल १५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Fake Talathi Recruitment : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारे एक मोठे बनावट रॅकेट उघडकीस आले आहे. हे रॅकेट तलाठी पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणांना तब्बल १५ लाख रुपयांना गंडा घालत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकारानंतर राज्यात एकच खळबळ उडाली.

उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी या टोळीने त्यांना थेट लॅपटॉप दिले होते. इतकेच नव्हे, तर त्यांचे फोटो काढून त्यांना बनावट प्रशिक्षणही देण्यात आले. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ या रॅकेटविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com