Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे, तब्बल ४०० किलोंचा माल जप्त; पाहा VIDEO

Kolhapur Jyotiba Temple: कोल्हापुरमधील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या जोतिबा डोंगरावर बनावट पेढे आणि बर्फी विकली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत तब्बल ४०० किलोंचा माल जप्त केला. या घटनेमुळे खळबळ उडाली.
Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे, तब्बल ४०० किलोंचा माल जप्त; पाहा VIDEO
Kolhapur Jyotiba TempleSaam Tv
Published On

Summary -

  • श्रावण षष्ठी यात्रेत जोतिबा डोंगरावर ४०० किलो बनावट पेढा आणि बर्फी जप्त.

  • अन्न व औषध प्रशासनाने व्यापाऱ्यांविरोधात केली कारवाई.

  • ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड.

  • पेढा आणि बर्फी १०० रुपये पावशरने विक्रीसाठी आणला होता.

  • जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नमुने तपासणीसाठी पाठवले.

रणजित माजगावकर, कोल्हापूर

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर परिसरात श्रावण षष्ठी यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविक दाखल होत असतात. याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी बनावट पेढे आणि बर्फी तसेच हलवा असे अन्नपदार्थ तयार करून विकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने ४०० किलो बनावट बर्फी पेढे जप्त करण्यात आलेत. या व्यापाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात येणार आहे. बनावट बर्फीमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

जोतिबा डोंगरावर आदीमाया चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेत काल ४०० किलो वजनाचा बनावट पेढा, बर्फी, स्वीट हालवा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. याची किंमत १ लाख रुपयांच्या आसपास आहे. ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगण यांच्यामुळे हा बनावट पेढे बर्फी विक्रीचा प्रकार उघडकीस आला. डफळापूर इथल्या उत्तम शिंदे यांच्या कडून खरेदी करून घेतलेला पेढा बर्फी हलवा हा माल सदाशिव वारेकर गणेश वारेकर पोपट वारेकर फारुक वजरवाड यांनी जोतिबा डोंगरावर विक्रीसाठी आणला होता. तो माल कालपासून जोतिबा डोंगरावर राजरोसपणे १०० रुपये पावशर याप्रमाणे ते विकत होते.

Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे, तब्बल ४०० किलोंचा माल जप्त; पाहा VIDEO
Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

जोतिबा डोंगरावर काल श्रावण षष्ठी यात्रा होती. या यात्रेत मेवा मिठाई विकण्यासाठी बाहेर गावचे ही व्यापारी दुकानदार येतात. जोतिबा डोंगरावरील माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे आणि ग्रामपंचायत अधिकारी विठ्ठल भोगण यांना हा बनावट प्रकारचा पेढा बर्फी खवा निर्दशनास आला. त्यांनी तात्काळ अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचूपते यांना कळवले. पाचूपते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून हा अर्धा टन भेळसळ माल जप्त करून तो ग्राम पंचायतीच्या कार्यालयात आणला.

Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे, तब्बल ४०० किलोंचा माल जप्त; पाहा VIDEO
Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

पंचनामा करून तो माल ट्रॉलीत भरून तो डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला. काल डोंगरावरील पायरी मार्गावरील मुख्य पेठेत यात्री १० वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना या बाजार पेठेतील विक्री केली जाणारे पेढे, बर्फी, खवा आणि अन्य मेवामिठाईचे नमुणे तपासणीसाठी तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या . त्यांनी हे पदार्थ तपासणीसाठी कोल्हापुरात पाठविण्यात आले आहेत. ही भेसळयुक्त मिठाई विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई होणार आहे.

Kolhapur: जोतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेत बनावट पेढे, तब्बल ४०० किलोंचा माल जप्त; पाहा VIDEO
Pune To Jyotiba Temple: पुण्याहून ज्योतिबा मंदिरासाठी प्रवास कसा कराल? वाचा वेळ, अंतर आणि सोयीसाठी गाईड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com