Shravan Month: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? धार्मिक नव्हे तर 'हे' आहे वैज्ञानिक कारण
श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो.
या महिन्यात मांसाहार, अंडी, मद्यपान वर्ज्य मानले जातात.
पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्याने मांसाहार टाळणे फायदेशीर ठरते.
धार्मिक आणि वैज्ञानिक कारणांसाठीही शाकाहार योग्य मानला जातो.
श्रावण महिन्याला भगवान महादेवाचा महिना म्हणतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त या महिन्यात उपवास करतात. या महिन्याभराच्या कालावधीत मांसाहार केला जात नाही. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात खाण्यापिण्याबाबत काही नियम सांगितले आहेत. या महिन्यात दही किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू खाल्ल्या जात नाहीत. वांगी, कारले आणि हिरव्या पालेभाज्या खाणं टाळण्यास सागितलं जातं. त्याचप्रमाणे, श्रावण महिन्यात मांस आणि मद्यपान करण्यास सुद्धा निषिद्ध मानले जाते.
या महिन्यात कट्टर मांसाहारी लोकही मांसाहार करत नाहीतं. यामागे केवळ धार्मिक कारण आहे, असं तु्म्ही म्हणाल परंतु तुम्हाला माहितीये का? या मागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत ज्यामुळे मांसाहार करण्यास सांगितलं जात नाही. श्रावण महिना हा भगवान महादेवाचा पवित्र महिना मानला जातो. घरात धार्मिक आणि सात्विक वातावरण असते. त्यामुळे वडीलधारी मंडळी या महिन्यात मांसाहार करू नका असा सल्ला देतात. या महिन्यात मांसाहाराव्यतिरिक्त मद्यपान किंवा धूम्रपान देखील निषिद्ध करण्यात येते. यामागे धार्मिक श्रद्धा आहेत, त्यासोबतच वैद्यकीय कारणे सांगितले जातात.
मांसाहार पचवायला जड
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यातील काळ. यादरम्यान हवेत गारवा, आर्द्रता असते. या ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत जड अन्न पचवणे कठीण होत असते. सामान्य दिवसांमध्येही मांसाहारी पदार्थ पचवण्यासाठी ५-६ तास लागतात.
तर श्रावण महिन्यात हे अन्न पचवण्यासाठी ८-१० तास लागू शकतात. जेव्हा अन्न आतड्यात बराच काळ राहते तेव्हा ते कुजण्यास सुरुवात होते. यामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच पावसाळ्यात हलके आणि सहज पचणारे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
गर्भधारणेचा काळ
बहुतेक सजीव पावसाळ्यात गर्भधारणा करतात. विशेषतः पाण्यात राहणाऱ्या सजीवांसाठी पावसाळा हा प्रजननाचा काळ असतो. जर तुम्ही यावेळी मांसाहारी पदार्थ खाल्ले तर ते जीवांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा आणेल. म्हणून मांसाहारी पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो.
संसर्ग होण्याचा धोका
पावसाळ्यात अन्न आणि पाणी सर्वाधिक दूषित होते. दूषित पाणी पिल्याने प्राण्यांना संसर्ग होऊ लागतो. माशांमध्ये संसर्ग वाढतो. संक्रमित मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने शरीरात समस्या निर्माण होऊ शकतात. वातावरणातील आर्द्रतेमुळे संसर्ग पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे प्राण्यांपासून संसर्ग होण्याचा धोका असतो.
आयुर्वेदानुसार, या महिन्यात केवळ मांसाहारीच नाही तर काही शाकाहारी पदार्थही खाऊ नयेत. या काळात पचन प्रक्रिया मंदावते. अशा परिस्थितीत, उच्च प्रथिनेयुक्त अन्न, दहीपासून बनवलेल्या गोष्टी पचवणे कठीण असते. वाताच्या समस्यादेखील वाढतात. म्हणून श्रावण महिन्यात कारले, हिरव्या पालेभाज्या, वांगी, मुळा, फणस हे देखील खाऊ नये.
श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा?
धार्मिकदृष्ट्या भगवान शंकराची कृपा मिळवण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पचनसंस्थेवर ताण येऊ नये म्हणून मांसाहार टाळला जातो.
यामध्ये कोणते पदार्थ वर्ज्य मानले जातात?
मांस, मासे, अंडी, मद्यपान, दही आणि काही भाज्या जसे वांगी, कारले, पालेभाज्या वर्ज्य असतात.
यामागे वैज्ञानिक कारण काय आहे?
पावसाळ्यात आर्द्रता वाढते. शरीराची पचनक्षमता कमी होते. मांसाहार पचायला जड असतो त्यामुळे तो टाळावा.
धार्मिक उपवास आणि शाकाहार याचा काय फायदा होतो?
शरीर डिटॉक्स होतं, मानसिक शांतता मिळते, पचनसंस्था विश्रांती घेते, आणि आरोग्य सुधारतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.