Dhanshri Shintre
सावन महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेसाठी उपवास केला जातो. अशा उपवासात खाण्यासाठी साबुदाणा रबडी ही एक स्वादिष्ट आणि परिपूर्ण रेसिपी आहे.
साबुदाणा रबडीसाठी १ कप साबुदाणा, दूध, साखर, वेलची पूड, तूप, चिरलेले बदाम, पिस्ते आणि पाणी लागते. ही खास रेसिपी ट्राय करा.
साबुदाणा रबडीसाठी सुरुवातीला साबुदाणा स्वच्छ धुवून २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवावा लागतो.
तूप गरम करून त्यात भिजवलेला साबुदाणा मंद आचेवर हळूहळू परतत तळून घ्या.
साबुदाणा तळल्यानंतर त्यात २ कप पाणी घालून तो पूर्ण मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
दुसऱ्या पॅनमध्ये दूध गरम करून त्यात साखर घाला. दूध आटवून त्यात वेलची पावडर मिसळा आणि शिजवा.
शिजवलेला साबुदाणा दूधात मिसळा, थंड झाल्यावर त्यात बदाम-पिस्ता घालून सजवा आणि उपवासासाठी सर्व्ह करा.
साबुदाणा रबडी तयार झाली आहे, थोडी थंड करा आणि उपवासाच्या जेवणासोबत आनंदाने सर्व्ह करा.