साधूच्या वेशात आले अन् सोन्याच्या अंगठ्या लंपास; 45 CCTV कॅमेऱ्यांनी अखेर भांडाफोड केला

Nashik Ojhar Fake Sadhu Gold Ring Theft Case: नाशिकच्या ओझरमध्ये साधूच्या वेशात दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास करणाऱ्या दोघांना पोलिसांनी मध्य प्रदेशातील खलघाटमधून अटक केली.
nashik crime news
nashik crime news saam tv
Published On

भूषण अहिरे, साम टिव्ही

साधूच्या वेशात येऊन भुरळ पाडायची आणि संधी साधून सोन्याच्या अंगठ्या लंपास करायच्या अशा पद्धतीने लूट करणाऱ्या टोळीच्या दोन आरोपींच्या ओझर पोलिसांनी मध्यप्रदेशातून मुसक्या आवळल्या आहेत. 22 जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पंचवड गणेश मंदिराजवळील निर्मल स्वीट परिसरात राकेश शिवप्रसाद शर्मा यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या दोन अनोळखी इसमांनी साधूचा वेश धारण करून भुरळ पाडत चोरी केल्या होत्या. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

nashik crime news
टॉप कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन पक्क म्हणत पालकांना गंडा; पुण्यातील 2 बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासासोबत तब्बल 45 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पाहणी केली. आरोपींच्या प्रवासाचा माग काढत ओझर पोलिसांचं पथक मध्यप्रदेशातील नर्मदा किनारी खलघाट येथे पोहोचलं आणि गर्दीच्या परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं जालीमनाथ कालूनाथ, वय 25 वर्षे आणि बंधननाथ माधूनाथ, वय 26 वर्षे, दोघेही मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील कसराबाद येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून 2 लाख 80 हजार रुपये किंमतीचं वितळवलेलं सोनं अर्थात सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली आहे. या टोळीने आणखी किती ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत, याचा सखोल तपास सुरू आहे.

nashik crime news
Mumbai: दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, ८ चोरीच्या बाईक जप्त

ही कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला एम. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या सूचनांप्रमाणे करण्यात आली. ओझर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खाडे, पोलीस शिपाई जितेंद्र बागुल, पोलीस शिपाई निलेश वाघ, पोलीस हवालदार हेमंत गिलबीले आणि पोलीस हवालदार प्रदीप बहीरम यांनी ही कारवाई केली.

nashik crime news
चोरांनी रात्री दुकान फोडलं, २२ किलो चांदी लंपास केली; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, आज 6 सप्टेंबर रोजी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. टोळीने आणखी कुठे-कुठे अशा प्रकारे चोरी केली आहे, याचा तपास आता ओझर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com