Fake Notes Scam: राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट! देवेंद्र फडणवीसांची माहिती | VIDEO

Fake Notes Scam In Maharashtra: सध्या राज्यात अनेक बनावट नोटा आहेत. चलनात अनेक नोटा या खोट्या आहेत. याबाबत स्वतः देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.
Fake Notes Scam
Fake Notes ScamSaam Tv
Published On

राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय. त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बनावट नोटांचा हॉटस्पॉट कुठे आहे? याची माहिती विधानभवनात दिलीय. 2020 पासून बनावट नोटांप्रकरणी किती गुन्हे दाखल करण्यात आलेत? बनावट नोटांचे केंद्रस्थान नेमके कुठे आहे?

Fake Notes Scam
PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

तुमच्या खिशातील नोटा बोगस

आपल्या खिशात असणारी नोट बनावट तर नाही ना? अशी भिती अनेकांना सतावत असते. कारण बनावट नोटांचा सुळसुळाट झालाय. 500 ची नोट घेताना तर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. अशातच विधानभवनातही बनावट नोटांचा मुद्दा चर्चेत आलाय. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेखी उत्तर देत बनावट नोटांचे हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणांसह कारवाईसंदर्भातील माहिती दिलीय...

चलनात 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट

2020 पासून राज्यात 273 गुन्हे दाखल

566 जणांना पोलिसांकडून अटक

आतापर्यंत 1.4 कोटींच्या बनावट नोटा जप्त

सरकारने स्वःताच मान्य केली अवैध कारखान्याची बाब

Fake Notes Scam
500 Rupee Note: 500 रुपयांच्या नोटेवर प्रभू श्रीरामाचा फोटो? व्हायरल नोटेचं सत्य काय? वाचा सविस्तर

राज्यातील बनावट नोटाचं रॅकेट उद्धवस्त करणं हे गृहखात्यासमोरचं आव्हान

दरम्यान काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमधील ज्वेलर्समधील एक व्यक्ती बँकेत पैसे जमा करायला गेली. त्यावेळी 500 रुपयांच्या सहा बनावट नोटा बंडलमध्ये आढळल्या. ज्यामुळे नोटा जमा करणाऱ्या व्यक्तीला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. त्यामुळे यापुढे कुणीकडूनही नोटा घेताना ती बनावट नाही ना? याची खात्री करून घ्या...अन्यथा खिशाला कात्री आणि तुरुंगवास दिवसरात्री.. अशीच परिस्थिती होईल.

Fake Notes Scam
Mumbai Tourism : हिरवा निसर्ग हा भवतीने...; वीकेंडला भेट द्या मुंबईजवळील 'या' थंडगार ठिकाणाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com